ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

साताऱ्यातील करंजेत गॅरेज चालकावर कोयत्याने हल्ला:शाहूपुरी पोलिसांकडून एकजण ताब्यात; परिसरात काही काळ तणाव

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास करंजे नाका परिसरात अक्षय गाडे याच्यावर संशयित हल्लेखोराने अचानक कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात गाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी हल्लेखोराला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येता शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून हल्लेखोराची सुटका करत त्याला ताब्यात घेतले.यावेळी पोलिस निरीक्षक सचिन मेह्त्रे घटनास्थळी उपस्थित होते. काही संतप्त नागरिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हल्ल्यामागील कारणांचा शोध पोलिस घेत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर