ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित:उमराणी बंधाऱ्यात उजनीचे पाणी अडले; शेतीचा प्रश्न गंभीर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. उजनी धरण येथून सोडलेले पाणी भीमा नदीवरील उमराणी गावाजवळ उभारलेल्या नव्या बंधाऱ्यात अडवले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या अडवणुकीमुळे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती धोक्यात आली आहे. उमराणी येथे सुमारे एक टीएमसी पाणी रोखल्याने महाराष्ट्रातील नऊ गावांना थेट फटका बसत आहे. नदीचा प्रवाह खाली पोहोचत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. सहा फेब्रुवारी रोजी उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे चार हजार चारशे क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. मात्र, हे पाणी उमराणी बंधाऱ्यात अडवले गेल्याने खालील भागात पोहोचलेच नाही. परिणामी लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर आणि चिंचपूर या गावांतील पिकांना पाण्याचा पुरवठा थांबला आहे. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उभ्या पिकांवर संकट आले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाणीअभावी परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद पडला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्याय शोधावे लागत आहेत. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केल्यावर सरकारकडे बोट दाखवले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधी आणि शेतकरी करत आहेत. मंद्रूप आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप उमराणी बंधाऱ्यातून पाणी खाली सोडण्यात आलेले नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही वागत असल्याचा आरोप दरम्यान, सोलापुरातील लोकप्रतिनिधीही या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. कर्नाटकने उजनीचे पाणी अडवल्यानंतर प्रशासनाने पुढील पाणी सोडणे थांबवले आहे. त्यामुळे सादेपूरखालील गावांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांनी हा विषय अधिवेशनात मांडून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आपल्या प्रतिनिधींना केली आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. दोन्ही राज्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे. खाली पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तरीही, जोपर्यंत उमराणी बंधाऱ्यातील पाणी खाली सोडले जात नाही, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे प्रश्न सुटणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणाकडे दोन्ही राज्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर