ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कोणार्कच्या 60 कर्मचाऱ्यांचे बडनेरा परिसरात कामबंद:तीन महिन्यांपासून नियमित वेतन देत नसल्याचा आरोप‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट मिळवणाऱ्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या झोन क्र. ४, बडनेरा येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून नियमित वेतन मिळत नसल्यामुळे हातातील झाडू खाली ठेवत कामबंद आंदोलन केले. कोणार्कच्या सफाई कामगारांबाबतच्या एकूणच धोरणामुळे शहरात आधीच स्वच्छतेबाबत बोंब असताना कर्मचारी दिवसभर कामबंद आंदोलन करीत असल्यामुळे पुन्हा या परिसरातील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोणार्कला स्वच्छतेचे कंत्राट दिल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही कंपनी सतत चर्चेत आहे. यांच्याकडे कचरा वाहून नेणारी वाहने फिट नाहीत, असा सातत्याने आरोप होत आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यांचा ईपीएफ कंपनीकडून नियमित भरला जात नाही. त्यांना ईएसआयसी अर्थात आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यास तशी सोय करण्यात आली नसल्याची ओरड कर्मचारी सातत्याने करीत आहेत. बडनेरा येथील कर्मचाऱ्यांनीही याच मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामबंद आंदोलन केल्यामुळे शहराच्या या उपनगरात दिवसभर स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे येथे सर्वत्र कचरा दृष्टीस पडत होता. महिनाभरात दुसरे आंदोलन सुमारे २५ दिवसांआधी इर्विन चौकात कोणार्कचे ८० सफाई कर्मचारी, कचऱ्याचे वाहन चालवणारे चालक व इतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी यशस्वीपणे मध्यस्थी केली. १५ दिवसांच्या आत थकलेले वेतन मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर एका दिवसांतच आंदोलन शमले होते. आता बडनेरा येथील ६० सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. नियमितपणे वेतन मिळत नसल्यामुळे सफाई कर्मचारी नाराज आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर