ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

प्रमुख रस्त्यांवर खड्डे कायम,‎ रस्ते पॅचिंगकडे मनपाचे दुर्लक्ष‎:आंदोलनाच्या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अहिल्यानगर मध्य शहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम आहेत. पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही महापालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केलेली नाही. सावेडी उपनगरातील भाजप नगरसेवकांनी दहा दिवसांपूर्वी महापालिकेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर पडला आहे. परिणामी, नागरिकांना अद्यापही खड्ड्यांचे दणके सोसावे लागत आहेत. मध्य शहरातील सर्जेपुरा ते भिंगारवाला चौक रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. दिल्लीगेट ते जुनी महापालिका रस्त्यावरही खड्डे आहेत. सावेडी उपनगरातील टीव्ही सेंटर उर्वरित पान ४ पॅचिंगसाठी एक कोटींची तरतूद केवळ कागदावरच महापालिकेने शहरातील प्रत्येकी दोन प्रभाग समित्यांसाठी एक यानुसार प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या दोन निविदा मंजूर आहेत. या सुमारे एक कोटींच्या निविदेपैकी सुमारे ३० लाख रुपये खर्च झाला आहे. उर्वरित तरतूद शिल्लक आहे. मात्र, या तरतुदी केवळ कागदावरच असून प्रत्यक्ष तिजोरीत मात्र खडखडाटच आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदारांकडूनही टाळाटाळ केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर