ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

अमित ठाकरेंच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी:गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा, विद्यार्थी सेनेच्या केकने वेधले लक्ष

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट ‘शिवतीर्थ’ गाठत अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थित केक कापला. अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले होते. याच दरम्यान, सकाळी आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंची भेट घेऊन त्यांना अत्यंत आपुलकीने गळाभेट दिली आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर दोन्ही ज्युनिअर ठाकरे बंधूंची ही पहिलीच भेट आहे. इंग्रजीला फाटा, मराठीतून गाणे गात शुभेच्छा अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा स्वाभिमान जपल्याचे पाहायला मिळाले. केक कापताना एरवी गायले जाणारे इंग्रजी गाणे टाळून, पूर्णपणे मराठीत गाणे गात अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ठाकरे कुटुंबातील हा घरगुती आणि जिव्हाळ्याचा सोहळा पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. केकमधून ‘नीट’ परीक्षेवर भाष्य वाढदिवसाच्या या सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आणलेल्या एका खास केकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधूनही विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला हात घालण्यात आला. सध्या देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, या केकवर “नीट हटवा, देश वाचवा” असा संदेश लिहिण्यात आला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर