ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात- चंद्रशेखर बावनकुळे:म्हणाले- नागपुरात महायुतीकडे 75% मते, बिनविरोधसाठी प्रयत्न करणार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूर विधान परिषदेची जागा ही बिनविरोध व्हावी या करता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे. कारण नागपूरमध्ये 75 टक्केपेक्षा जास्त मते महायुतीकडे आहेत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, त्यामुळे राज्यभरात ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात त्या बिनविरोध केल्या पाहिजेत, त्याकरता आम्ही सर्वच जण पुढाकार घेणार आहोत, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमधील जागा वाटपावर तिन्ही पक्षाचेनेते एकत्र बसून चर्चा करतील. अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील. रायगड पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतील. आखाती देशांतील युद्धामुळे इंधन टंचाई चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आखाती देशातील युद्धामुळे जगावर मोठे संकट निर्माण झाले आहे, त्यामुळे जी पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाली आहे, त्याचे जे पडसाद आहे ते पडणारच आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी आवाहन केले आपला देश बचावला आता आपत्तीच्या काळात आवाहन केले तसे देश सुधारेल. मोदींनी केलेलं आवाहन हळुहळु सगळे स्वीकारतील. यामध्ये राजकारण न करता पंतप्रधान मोदी यांनी जे आवाहन दिले आहे त्यांना पाठबळ दिले तर आपण यातून बाहेर पडू. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्र्यांची ‘ऑनलाईन’ हजेरी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीला काही मंत्री ऑनलाईन पद्धतीने तर काही मंत्री तिथे उपस्थित राहतील. ज्यांचे विषय आहेत त्यांना मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित रहावे लागले, ज्यांचे विषय नाही ते मंत्री ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतील.कोरोना काळात सुद्धा अशा बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सुद्धा विषय सुटू शकतो. ऑपरेशन टायगरबद्दल माहिती नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना इतर पक्षाचे नेते येऊन भेटतात ते त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी येऊन भेटत असतात. त्यांचा अर्थ असा नाही की आमच्या महायुतीमध्ये अलबेल नाही असे होत नाही. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरबद्दल प्रश्न विचारला असता त्याबद्दल मला काही माहिती नाही असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर