ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

उद्या ‘स्थानिक’च्या निवडणुकांचा निकाल:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला भाजपच्या विजयाचा विश्वास; काँग्रेसने साधला निशाणा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यानंतर उद्या रविवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. तत्पूर्वी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. उद्याचा निकाल भाजप व महायुतीसाठी विजयाचा दिवस असणार आहे. भाजपला कधी मिळाले नाही एवढे यश या निवडणुकीत मिळेल. विशेषतः जिथे आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, त्या नगरपालिकांवरही भाजपची सत्ता येईल, असे ते म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. ते म्हणाले, उद्याचा निकाल भाजप व महायुतीसाठी विजयाचा दिवस असणार आहे. भाजपला कदी मिळाले नाही एवढे यश नगरपरिषद निवडणुकीत मिळेल. आम्ही जिथे कधीच जिंकलो नव्हतो त्या नगरपालिकाही आम्ही जिंकणार आहोत. प्रचारात आम्ही पाहिले की, मतदारांचा कल भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत नाही. हा अजित पवारांच्या पक्षाचा अधिकार आहे. त्यांचा निर्णय अजित पवार, सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल घेतील. मित्रपक्षांत कटूता येणार नाही याची काळजी घेणार ते पुढे म्हणाले, आम्ही महायुती म्हणून जनतेच्या समोर जात आहोत. कार्यकर्ते आमच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवून आहेत. पण सर्वांना संधी देणे शक्य नाही. त्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढेल. तिथे आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. या प्रकरणी कटूता निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. मुंबईतील जागावाटप दोन दिवसांत होील. भाजप व शिवसेनेची कोअर कमिटी याविषयी अंतिम निर्णय घेईल. पहिल्या टप्प्यात शिवसेना व भाजपचे कोअर कमिटी सदस्य चर्चेसाठी बसत आहेत. जिथे कमी जागा आणि जास्त दावेदारी आहे, तिथे काही अडचणी आहेत. पण शेवटी निर्णय अजित पवारांना घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही त्यावर काहीही बोलू शकत नाही. आज पुणे, पिंपरी चिंचवड येथील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपचा महापौर होईल यात शंका नाही, असे ते म्हणाले. वडेट्टीवारांचा बावनकुळेंवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळेंनी विजयाबद्दल व्यक्त केलेल्या ठाम विश्वासाचा समाचार घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पैसा व बोगस या मतदानाच्या जोरावर भाजपच्या विजयाचा दावा करत आहेत. माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार, नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने मोठा जोर लावला आहे. भाजप तिथे एका मतासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये देत आहे. छोटी नगरपरिषद आहे. पण एका प्रभागामध्ये 700 ते 1200 मतदान आहेत. एवढ्या छोट्या पालिकेसाठी भाजप 40 कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे त्यांनी आम्ही जिंकलो म्हणून आत्ताच गुलाल उधळावा. त्यांनी निकालाचीही वाट पाहू नये, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर