ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

6 व्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले:1 जण ठार, 5 जखमी; मुंबईतील चेंबूर परिसरातील सुभाष नगर येथील भयंकर घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील चेंबूर परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. चेंबूरच्या सुभाष नगर भागातील एका निर्माणाधीन इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून 6 कामगार कोसळलेत. या घटनेत एका कामगाराचा मृ्त्यू झाला असून, 5 जण जबर जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुभाष नगर येथील एका आलिशान इमारतीचे वेगात बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुपारी 12.05 च्या सुमारास या ठिकाणी कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते. ते इमारतीच्या 6 व्या मजल्यावर बांधकाम करत होते. यावेळी 6 कामगार अचानक तोल जावून 80 ते 90 फूट उंचीवरून खाली कोसळले. या घटनेत 6 कामगार जबर जखमी झाले. त्यातील एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बांधकामस्थळी असणारे इतर कामगार व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सर्वच कामगारांना त्यांनी तातडने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी 5 पैकी काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरील पंचनामा केला आहे. सुरक्षा नियमांकडे साफ दुर्लक्ष या प्रकरणी सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे सदर कामगार एवढ्या उंचीवर काम करत असतानाही त्यांनी सेफ्टी किट वापरले नव्हते. नियमानुसार, उंच इमारतीवर काम करत असताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व नेट असणे अनिवार्य आहे. पण या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे साफ उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. या कामगारांनी सेफ्टी बेल्ट लावले अकसते तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती अशी चर्चा घटनास्थळी सुरू आहे. काय आहेत जखमी कामगारांची नावे? राजावाडी रुग्णालयात रामाल्लू नामक 55 वर्षीय कामगाराला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित 5 कामगारांवर सध्या उपचार सुरू आहेत. 22 वर्षीय कामगार गुनाधर राय हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय उसराई (30), रमेश राय (25), विजय (35) व संदीप (27) अशी इतर जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षिततेवरती पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. आज सकाळीच आणखी एक दुर्घटना दुसरीकडे, मुंबईतील वरळी – शिवडी उन्नत मार्गाच्या कामात लोखंडी रॉड कोसळून अशीच एक घटना घडली आहे. विकसाकामांवेळी झालेली या महिन्यातील ही मुंबईमधील दुसरी दुर्घटना आहे. हा लोखंडी रॉड एका व्यक्तीवर कोसळला आहे. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. केईएम रुग्णालय परिसरात ही दुर्घटना घडली आहे. सध्या जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर