ब्रेकिंग न्यूज
⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती
SP News Maregaon

करणवाडीत अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताहाचे भव्य आयोजन

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील करणवाडी नगरीमध्ये समस्त ग्रामवासीयांच्या वतीने अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा दि. १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत दुपारी १.०० ते ५.०० या वेळेत श्री. तात्याजी लटारी जिवतोडे यांच्या शेतात, जिल्हा परिषद शाळेसमोर, करणवाडी येथे संपन्न होणार आहे.

या कथा सप्ताहात परमपूज्य धर्माचार्य प.पू. श्री. कृष्णकुमार पाण्डेय महाराज (श्रीक्षेत्र काशी, वाराणसी, उ.प्र.) यांच्या सुमधुर वाणीतून श्रीकृष्ण कथेचे अमृतमय कथन होणार आहे. तसेच भारूड प्रबोधनकार श्री. संतोष महाराज भालेराव (वाशीम) यांचे भारूड, तर किर्तनकार आ. ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज वाघ यांचे प्रभावी किर्तन होणार आहे.

दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य कलश यात्रा व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. कथा सप्ताहादरम्यान विविध वारकरी मंडळांचे हरिपाठ, भजन, किर्तन, भारूड व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ६.०० ते ७.०० व सायंकाळी ६.०० ते ६.३० या वेळेत सामूहिक प्रार्थना कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत दररोज विविध भजन मंडळांचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. दि. २२ जानेवारी रोजी भव्य ग्रंथ शोभायात्रा व भजन होणार असून, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत गोपाल काला व किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या प्रसंगी यांचे किर्तन,परमपूज्य धर्माचार्य प.पू. श्री. कृष्णकुमार पाण्डेय महाराज (श्रीक्षेत्र काशी, वाराणसी, उ.प्र.) वृंदावन येथील श्री. राम बाबा यांच्या झांकी, तसेच नामवंत गायक व वादकांची साथ लाभणार आहे. भाविकांसाठी सायंकाळी ५.०० वाजल्यापासून महाप्रसाद (भोजन) ठेवण्यात आला आहे.या पवित्र व भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समस्त करणवाडी ग्रामवासी यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर