ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस:2029-30 पर्यंत महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य बनेल- मुख्यमंत्री; नाशिक टीसीेएस धर्मांतर प्रकरणावरही चर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (बुधवार) तिसरा दिवस असून, पहिल्या दोन दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता आजचे कामकाजही अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत वीजदर तसेच नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणावर चर्चा झाली. यावेळी चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटले की, या प्रकरणात कंपनी तपासात सहकार्य करत आहे, योग्य कारवाई सुरू आहे. दुसरीकडे, विधानसभेत कर्जमाफीचा मुद्दा गाजला, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी “लाखो कोटींचे महामार्ग करायला पैसे आहेत, मग शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची दानत सरकारमध्ये का नाही? असा सवाल उपस्थित केला. यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका सविस्तर मांडत काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. येथे वाचा सविस्तर वृत्त दरम्यान, कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनात झालेल्या चुकीवरून आज दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, माझा तसा कोणताही हेतू नव्हता. प्रिंट अस्पष्ट होती, फाँट लहान होता. या राज्यात दिवंगत आशाजींबद्दल कोणीही अनादर व्यक्त करू शकत नाही. माझेही मराठीवर प्रेम आहे. झाल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकला. विधान परिषदेत गाजला वीज दरांचा मुद्दा विधान परिषदेत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विजेच्या दरांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, रेट्रोस्पेक्टिव्हप्रमाणे ग्रीड चार्जेस का लागले. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की, या विषयाकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. फीडरवर तुम्ही मीटर लावा जेणेकरून नेमकं कळेल की किती वीज या ठिकाणी जाते. माझी विनंती आहे की, सगळ्या घटकांना एकत्र बोलवा. एमएआरसीमधून जो अन्याय चालला आहे, त्यावर सरकार लक्ष घालत नाही तोपर्यंत हे दूर होणार नाही. दर कमी झाल्याचं सरकार म्हणतंय, पण प्रत्यक्षात चार्जेस वेगळे आहेत. इतर राज्यांपेक्षा वीजदर कमी झाल्याचं सांगितले जातं, पण ती वस्तुस्थिती नाही. 2030पर्यंत महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य बनेल:मुख्यमंत्र्यांची ग्वाही विविरोधकांच्या या प्रश्नांना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह सडेतोड उत्तर दिले. “पुढील दोन वर्षांत राज्याचे वीजदर गुजरातपेक्षाही कमी होतील आणि 2029-30 पर्यंत महाराष्ट्र हे देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य बनेल,” अशी महत्त्वपूर्ण ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. तसेच, वीज वितरण यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्यात ‘आरडीएसएस’ (RDSS) योजनेअंतर्गत 25 हजार कोटी रुपयांची कामे सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. येथे वाचा सविस्तर बातमी “प्रिंट बारीक आणि अस्पष्ट होती, त्यामुळे चूक झाली”; शोकप्रस्तावावेळच्या मराठीतील चुकांवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सभागृहात दिलगिरी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मान्यवरांचे शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या मराठी उच्चारांच्या चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात अधिकृत दिलगिरी व्यक्त केली आहे. अध्यक्षांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, वाचनासाठी त्यांच्या हातात देण्यात आलेली शोकप्रस्तावाची प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये आणि अस्पष्ट होती. त्या माहितीत काही तांत्रिक चुका होत्या, ज्या सुरुवातीला निदर्शनास न आल्याने तशाच वाचल्या गेल्या. गेल्या साडेचार वर्षांपासून आपण सभागृहाचे संपूर्ण कामकाज आणि नियम मराठीतूनच हाताळत आहोत. राज्यातील कोणत्याही सदस्याला किंवा व्यक्तीला मराठी भाषेचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच सार्थ अभिमान आपल्यालाही असल्याचे नार्वेकर यांनी आवर्जून नमूद केले. ‘स्वर्गीय आशाताई भोसले’ यांच्याबद्दल अवमानस्पद बोलण्याचा विचार राज्यातील कोणतीही व्यक्ती करू शकत नाही, आणि विधानसभा अध्यक्ष तर मुळीच तसे करू शकत नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. केवळ एका तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला असून, या वाचनामुळे सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचे मन दुखावले असेल, तर त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. अध्यक्षांच्या या स्पष्टीकरणानंतर एका सदस्याने हा मुद्दा उचलून धरत, चुकीची आणि अस्पष्ट प्रिंट देऊन अध्यक्षांची व पर्यायाने सभागृहाची प्रतिमा मलीन करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर यथोचित कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायद्या’वरून (UCC) सत्ताधारी महायुतीमध्येच उडालेला भडका, बीड हत्याकांडावरून मुंडे बंधू-भगिनींनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचा लोडशेडिंगबाबतचा दावा यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. आज विरोधक याच मुद्द्यांवरून आणि पहिल्या दिवशी मांडलेल्या 97 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी कालच्या महत्त्वाच्या घडामोडी… सत्ताधाऱ्यांमध्येच खडाजंगी: ‘तिहेरी तलाक’ आणि ‘UCC’चा मुद्दा काल विधानसभेत समान नागरी कायदा (UCC) आणि तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडत मुस्लीम महिलांवरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनी अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले. “बहुपत्नीत्व केवळ मुस्लीम धर्मात नाही. भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली. सना मलिक यांच्या या विधानावर भाजपच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेत, “हा देश संविधानावर चालतो, कुराणवर नाही!” असा पलटवार केला. आज विरोधक महायुतीमधील या अंतर्गत वैचारिक दुफळीचा फायदा घेत सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. बीड हत्याकांडाचे पडसाद: मुंडे बंधू-भगिनी आक्रमक बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले हत्याकांडाचे तीव्र पडसाद काल विधानसभेत उमटले. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत, “हत्येमागील मास्टरमाईंडचा पोलिसांकडूनच बचाव सुरू आहे,” असा गंभीर आरोप केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृह विभागाला तात्काळ योग्य चौकशीचे निर्देश दिले आहेत. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निवेदन देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा: “राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही” राज्यातील पाणीटंचाई आणि वीज कपातीवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले. “काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते, परंतु या आपत्कालीन परिस्थितीतही राज्य सरकारने एकाही दिवशी अधिकृत भारनियमन (लोडशेडिंग) केलेले नाही,” असा ठाम दावा मुख्यमंत्र्यांनी केला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स पाहण्यासाठी खालील लाइव्ह ब्लॉगमधून जा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर