ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर वेरूळात उत्साहात:केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आज वेरूळ येथील हॉटेल अशोक येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड, पक्षाच्या प्रभारी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी आमदार संजय केनेकर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. अंत्योदय हाच भाजपाचा मूलमंत्र – केंद्रीय मंत्री भागवत कराड कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ हाच भारतीय जनता पार्टीच्या कामाचा गाभा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे. केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या 9 वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला व आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ सक्षमीकरणावर भर देण्याचे आवाहन केले. संघटन हेच शक्ती – प्रीतम मुंडे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, भाजपा ही कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारी पार्टी आहे. 2024 मध्ये पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी प्रत्येक बूथवर 50 सक्रिय कार्यकर्त्यांची फळी उभी करा. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा. त्यांनी वेरूळ विकास आराखड्यासाठी केंद्राकडून मिळालेल्या 210 कोटींच्या निधीचा उल्लेख करून, वेरूळचा कायापालट करणे ही आपली जबाबदारी आहे, असे स्पष्ट केले. संघटन बांधणीवर भर- संजय केनेकर माजी आमदार संजय केनेकर यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, नवीन मतदार नोंदणी, ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी मेळावे घेण्यावर भर द्यावा. कार्यकर्ता असताना खूप संकटे सामोरे जावे लागते याची धमक माणसाची अंगी असली पाहिजे, अशी सरळ भाषेत योग्य ते मार्गदर्शन करत केनेकर यांनी शिबिर सत्रात योग्य ते मार्गदर्शन करत नवीन व संपूर्ण कार्यकर्त्यांना मातीशी जुळून जाण्याचे व मातीशी जुळून राहण्याचे उपदेश देत मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला मोर्चा, युवा मोर्चा, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व बूथ प्रमुख मोठ्या संख्येने हजर होते. हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यांतून सुमारे 2 हजारांहून अधिक कार्यकर्ते या प्रशिक्षण शिबिरासाठी वेरूळ येथे दाखल झाले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या या शिबिरात संघटनात्मक बांधणी, सोशल मीडिया हाताळणी, केंद्र व राज्य सरकारच्या योजना अशा विविध विषयांवर सत्रे घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष यांनी मानले. ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर