ब्रेकिंग न्यूज
Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार
SP News Maregaon

शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी:रासायनिक खते व बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यावर तपासणीची मात्रा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी बार्शी कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातील विविध कृषी नि विष्ठा (खते, बियाणे व औषधे) विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यंदा ‘एल निनो’च्या सावटामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कमी कालावधीत येणाऱ्या बियाण्यांची आणि युरिया, डीएपी या खतांची बाजारात मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा बोगस बियाणे विकणे असे प्रकार घडू शकतात. हे रोखण्यासाठी कृषी विभागाने ही झाडाझडती सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांनी दुकानांमधील साठ्याची प्रत्यक्ष तपासणी केली असून, दर्जा तपासण्यासाठी निविष्ठांचे नमुनेही घेतले आहेत. सर्व कृषी सेवा केंद्र – चालकांनी दुकानातील भावफलक आणि साठा फलक दररोज अद्ययावत ठेवावा, शेतकऱ्यांना खरेदीची पक्की पावती द्यावी आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सक्त सूचना जिल्हा कृषी अधीक्षक भोसले यांनी दिल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द करण्यासह कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. बीज प्रक्रिया करून पेरा पेरणीपूर्वी बियाण्यांची बीज प्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते. तसेच बुरशी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जैविक किंवा रासायनिक औषधांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, त्यामुळे कमी पावसातही पिकांची वाढ चांगली राहण्यास मदत होते. कमी पावसात बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ आणि हरभरा ही पिके फायदेशीर ठरतात. ही पिके कमी पाण्यात तग धरतात व नुकसानाचा धोका कमी असतो. कमी पाऊस व पावसातील खंड लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीच्या व दुष्काळ सहन करणाऱ्या बियाण्यांची निवड करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणी घाईत न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करावी, असेही आवाहन केले आहे. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी कमी पावसाच्या परिस्थितीत मिश्रपीक आणि आंतरपीक पद्धती शेतकऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतात. तूर व उडीद, सोयाबीन व तूर किंवा ज्वारी व मूग अशी आंतरपिके घेतल्यास एका पिकाचे नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळू शकते. यामुळे जमिनीतील ओलावा टिकतो आणि धोका कमी होतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर