ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पार्थ पवारांच्या शपथविधीत पेहराव ठरला चर्चेचा:अजित पवारांच्या शैलीत गुलाबी जॅकेट परिधान; आवाज-देहबोलीतही त्याच छटा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेतील प्रवेशावर चर्चा सुरू होती. त्यांच्या सोबतच्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या इतर सर्व खासदारांचा शपथविधी आधीच झाला होता. त्यामुळे पार्थ पवार कधी शपथ घेणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांच्या शपथविधीने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या सोहळ्यात मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते त्यांच्या पेहरावाने. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शैलीतील गुलाबी जॅकेट परिधान केले होते. अजित पवार यांचा खास ओळख बनलेला हा पेहराव पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भावना दाटून आल्या. त्यांच्या आवाजात आणि देहबोलीतही काही प्रमाणात अजित पवारांची छटा जाणवत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत पार्थ पवारांच्या शपथविधीला अधिकच भावनिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहिले जात होते. दरम्यान, पार्थ पवारांच्या या नव्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शपथविधी सोहळ्यातील त्यांचा साधा पण प्रभावी अंदाज आणि अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देणारा पेहराव यामुळे हा क्षण अनेकांसाठी विशेष ठरला. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ पार्थ पवार यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ यांना शपथ दिली. यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि भाजपचे नेते जे. पी. नड्डा यांची उपस्थिती होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर