ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही:प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त, रोहणखेडा-पर्वतापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी धरणाचे सुरू असलेले बांधकाम पाडले बंद‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पेढी बॅरेजसाठी तब्बल ८५० एकर जमीन देऊन विस्थापित झालेल्या रोहणखेडा-पर्वतापूर येथील नागरिकांचा संयम अखेर संपला असून पुनर्वसनाच्या मागणीसाठी त्यांनी थेट धरणाच्या कामावरच ब्रेक लावला आहे. “आधी पुनर्वसन, मग धरणाचे काम” अशी ठाम भूमिका घेत संतप्त ग्रामस्थांनी पुनर्वसन स्थळी सुरू असलेले धरणाचे काम बंद पाडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रश्नावर प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मौजे रामगाव येथील गट क्रमांक ४३ ची जमीन संपादित होऊन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असताना गट क्रमांक ११९ च्या संपादनाबाबत मात्र जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. २ जून रोजी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. धरणासाठी जमीन दिल्यानंतर शेती, रोजगार आणि उदरनिर्वाहाची साधने हिरावली गेली असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. “प्रशासनाला धरणाचे काम महत्त्वाचे वाटते, मात्र ज्यांच्या जमिनी गेल्या त्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न दुर्लक्षित केला जात आहे. आमच्या हक्काचे पुनर्वसन मिळाल्याशिवाय धरणाचे काम पुढे जाऊ देणार नाही” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.यावेळी सतीश गोटे, किशोर भेलकर, मोना भिलकर, राजेश तायडे, ललिता खडसे, जयश्री देशभ्रतार, रवी कोल्हे, शितल वाळके, प्रवीण तायडे, सुनील खडसे, नीलेश कडू, नितीन रायबोले, आकाश खडसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ^विस्थापितांचे पुनर्वसन प्रलंबित असताना धरणाचे काम सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा हट्ट संतापजनक आहे. एकीकडे नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला असतांना शासनाद्वारे नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल. सतीश गोटे, संचालक, कृ.उ.बा.स. अमरावती, तथा निवेदनकर्ते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर