ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दिव्य मराठी ब्रेकिंग:संभाजीनगर विमान आता ‘नवी मुंबई’त उतरणार; प्रवाशांची गैरसोय; नवी मुंबई विमानतळावरून मंत्रालयात पोहोचण्यासाठी लागतील 2 तास

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईला जाणारे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी आता नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. हा बदल उन्हाळी सत्राच्या वेळापत्रकात करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या विमानतळावरून मुंबई गाठण्यासाठी सुमारे २ तास लागण्याची शक्यता आहे. इंडिगोचे मुंबईहून सकाळी ६.१० वाजता निघणारे विमान छत्रपती संभाजीनगरला सकाळी ७.२० वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी विमान सकाळी ७.५० वाजता निघून मुंबईला सकाळी ८.५५ वाजता पोहोचते. सकाळच्या विमानाला मोठी गर्दी असते. ‘वंदे भारत’ आता १० मिनिटे उशिरा सुटेल वंदे भारत छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८.१५ वाजता सुटत असे. सुधारित वेळेनुसार ३ मे २०२६ पासून वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ८.२५ वाजता सुटणार आहे. छत्रपती संभाजीनगरहून १० मिनिटे उशिरा सुटूनही मुंबई सीएसटीएमला मात्र पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत १० मिनिटे लवकर (दुपारी २.२५ ऐवजी २.१५ वाजता) पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात सायंकाळी ६.५३ ऐवजी सायंकाळी ६.४३ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पोहोचेल. तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली होती. ऑक्टोबरअखेरपर्यंत नवीन रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले नाही अशी होणार अडचण नवी मुंबई विमानतळावर सकाळचे विमान याच वेळेत गेल्यानंतर विदेशी पर्यटकांना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जावे लागेल. रस्तेमार्गाने जायचे झाल्यास २ तासांपेक्षा जास्तीचा वेळ जुन्या विमानतळासाठी लागेल. इतर प्रवासी मुंबई शहरात जाऊ इच्छितात, त्यांनाही दोन तासांचा अ‌धी लागू शकतो. शिवाय मुंबई शहरातील वाहतुकीमुळेही प्रवासासाठी अधिकचा वेळ लागेल. इनसाइड स्टोरी- राजकीय नेत्यांची ताकद अपुरी संभाजीनगर येथून सकाळी ६ वाजता सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ची वेळ २ तासांनी वाढवल्यानंतर ही रेल्वे गैरसोयीची झाली. पूर्वी संभाजीनगरहून सकाळी ६ वाजता निघून दुपारी १२.३० वाजता मुंबईला पोहोचत होती. त्यामुळे मंत्रालय, उच्च न्यायालयांत वेळेत पोहोचणे शक्य होते. परतीसाठी दुपारी ३ रेल्वेंचे पर्याय होते. त्यामुळे सकाळी सुटणारी रेल्वे सुरू करण्याची मागणी होती. मात्र, सकाळची रेल्वे सुरू करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींची ताकद कमी पडली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर