ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

टप्प्या टप्प्याने महागाईचा धक्का देण्याचे सरकारचे सूत्र:घरगुती गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात, दिला मोठा इशारा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच गगनाला भिडलेल्या असताना, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक तीव्र झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas) दरात थेट २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. केंद्राच्या या धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कडाडून टीका केली असून, सत्ताधाऱ्यांना याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. या दरवाढीवर आपली पहिली प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “हे असंच चालणार, हे दर सातत्याने वाढवले जात आहेत. या वाढत्या महागाईचा थेट परिणाम आज सामान्य माणसाच्या संसारावर होत आहे. पंतप्रधानांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित करत असल्याचे सांगितले होते. पण, ‘नियंत्रित’ करणे याचा अर्थ जनतेला टप्प्याटप्प्याने महागाईचे धक्के देणे, हेच त्यांचे सूत्र बनले आहे. या निर्णयांची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी नक्कीच कळेल.” दिल्ली-मुंबईत नवे दर लागू; तीन महिन्यांत दुसरी मोठी वाढ ही दरवाढ १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरवर करण्यात आली असून, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी मोठी वाढ आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी सिलिंडर थेट ६० रुपयांनी महागला होता. नव्या दरवाढीनुसार प्रमुख शहरांतील किंमती पुढीलप्रमाणे आहेत. मुंबईमध्ये आधीचा दर ९१२.५० रुपये होता, तो आता ९४१.५० रुपयांवर पोहोचला आहे. तर राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडर ९१३ रुपयांवरून थेट ९४२ रुपयांवर गेला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच महिन्यांत दुप्पट घरगुती गॅससोबतच व्यावसायिक सिलिंडरच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. १ जून रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात ४२ रुपयांची वाढ केली होती. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच महिन्यांत १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे दर तब्बल दुप्पट झाले आहेत. १ जानेवारीपूर्वी या सिलिंडरचा दर १५८० रुपये होता. १ जून रोजी हाच दर थेट ३,११३.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. आगामी काळात दर आणखी वाढण्याची भीती पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच मेटाकुटीला आले आहेत. त्यातच एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांना अजूनही प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे सुमारे ७०३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी काळात गॅस आणखी महागण्याची भीती बाजार तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर