ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

धर्मेंद्र प्रधान यांनी अजून राजीनामा का दिला नाही?:आंबेडकरांचा नीट पेपरफुटी प्रकरणी सवाल; नीट परीक्षा UPSC कडे सोपवण्याची मागणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? त्यांचा उद्दामपणा व अहंकार त्यांना राजीनामा देण्यापासून रोखत आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नीट परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया NTA कडू काढून घेऊन UPSC कडे सोपवण्याचीही मागणी केली. नीट 2026 परीक्षा गत 3 मे रोजी झाली. पण अवघ्या 3 दिवसांतच हा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले. अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) संपूर्ण नीट परीक्षाच रद्दबातल करत देशातील 23 लाख विद्यार्थ्यांना जबर झटका दिला. आता ही परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील 6 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मृत्यूला कवटाळले आहे. तर या पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत 10 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. विरोधकांनी या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण तूर्त तरी केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी यूपीएससीकडे सोपवा या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तिखट शब्दांत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? त्यांचा उद्दामपणा व अहंकार त्यांना राजीनामा देण्यापासून रोखत आहे. त्यांचा हा उद्दामपणा त्यांच्या मंत्रिपदाच्या खुर्चीविषयीची आसक्ती व NEET-UG 2026 ची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे देशातील 23 लाख विद्यार्थ्यांचे कष्ट वाया गेले, हे वास्तव स्वीकारण्याची अनिच्छा दिसून येते. सरकारने नीट परीक्षेच्या प्रक्रियेत सुधारणा करावी व ही परीक्षा घेण्याची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) सोपवण्यात यावी. पण तत्पूर्वी, धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचे करिअर व भविष्य धोक्यात टाकले आहे, असे ते म्हणाले. पेपरफुटीमुळे देशात संतापचे वातावरण दुसरीकडे, नीट पेपरफुटीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने मेहन घेतल्यानंतर परीक्षा दिली होती. पण परीक्षा प्रक्रियेवरच संशय निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांत तीव्र नाराजी पसरली आहे. विविध राज्यातील विद्यार्थी या प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. विरोधी पक्षांकडूनही कंद्र सरकार व शिक्षण मंत्रालयावर टीकेची झोड उठवली जात आहे. परीक्षा प्रक्रियेत वारंवार होणारे कथित घोटाळे, प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दुसरीकडे, केंद्राकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नीट परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा मुद्दा आगामी काळात आणखी गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर