ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

नदीष्टचा अभ्यास:मनोज बोरगावकर यांची ‘नदीष्ट’ एम. ए. हिंदीला; नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिकवणार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठवाड्यातल्या नांदेडचे सुप्रसिद्ध लेखक आणि कवी मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम. ए. हिंदीच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलाय. मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीच्या आत्तापर्यंत 21 हून अधिक आवृत्त्या निघाल्यात. विशेष म्हणजे या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचा तब्बल 5 लाख रुपयांच्या राष्ट्रभाषा सन्मानाने गौरव झालाय. नदीष्ट कादंबरीचे हिंदी, गुजराती, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवाद झालेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी या कलाकृतीचा गौरव झालाय. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांपासून तिने मराठी मनावार गारूड केले आहे. असे होईल अध्ययन… नदीष्ट कादंबरीचा हिंदीमध्ये गोरख थोरात यांनी अनुवाद केलाय. उत्तर प्रदेशमधल्या नोएडा येथील सेतू प्रकाशानाने तो प्रसिद्ध केलाय. आता या अनुवादीत नदीष्ट कादंबरीचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम. ए. हिंदीच्या चौथ्या सेमिस्टारच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश झालाय. त्यानुसार ‘नदीष्ट- उपन्यास की कथावस्तु’, ‘नदीष्ट-उपन्यासः मन्युष्य और पर्यावरण’, ‘नदीष्ट-उपन्यास का उद्देश्य’, ‘नदीष्ट-उपन्यास की समीक्षा’ या अनुषंगाने 60 गुणांसाठी या कादंबरीचे अध्ययन आणि अध्यापन होणार आहे. नदी, पर्यावरण, एलजीबीटी समूह… मनोज बोरगावकर यांची नदीष्ट ही वाचकप्रिय कादंबरी 2019 साली ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केली. नदी , पर्यावरण व ‘एलजीबीटी’ समूह ह्या आजच्या जागतिक स्तरावरील समस्यांवर ही कादंबरी आधारलेली आहे. निसर्ग, माणूस व त्यांचे अद्वैतभाव ती प्रकर्षाने दृग्गोचर करते. नदीष्टला आशय, विषय व रूपबंधाच्या आगळ्या-वेगळ्या मांडणीमुळे उदंड वाचक प्रेम तर लाभलेच शिवाय तिला अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत. या कादंबरीचा लेखिका डॉ. उर्वशी मनुप्रसाद पंड्या यांनी गुजराती भाषेत अनुवाद केलाय. तिचा कन्नडमध्ये सुद्धा अनुवाद झालाय. खेडेकरांच्या आवाजात ऑडिओ बुक… नदीष्ट ही बहुचर्चित कादंबरी स्टोरीटेल इंडियाने ऑडिओ बुक स्वरूपातून आणली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या अभिवाचनातून साहित्यप्रेमी वाचक हा ठेवा उपलब्ध झाला आहे. या ऑडिओ बुकचे मुखपृष्ठ नीलेश साठे या कलावंताने केले आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर आणि स्टोरीटेल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचा व ऐका” या योजनेचा शुभारंभ व नदीष्ट ऑडिओ बुकचे प्रकाशन झाले होते. बोरगावकर यांची पुस्तके – अकथ कहाणी सद्गुणांची (ललित) – कोरा कागद निळी शाई (कवितासंग्रह) – नदीष्ट (कादंबरी) – पाश्चिमात्य विचारप्रवाह – लोकप्रशासन – स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह संबंधित वृत्तः कलेचा मान:बोरगावकरांच्या ‘नदीष्ट’ला 5 लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान; बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांच्या हस्ते गौरव लेखकाचा गौरव:मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीला 5 लाखांचा पुरस्कार; राष्ट्रभाषा सन्मानाच्या अंतिम फेरीत धडक नदीष्ट पर्व गुजरातीमध्ये:साहित्य अकादमीकडून कादंबरीचा अनुवाद प्रकाशित; मनोज बोरगावकरांच्या लेखणीला मानाचे पान मानाचे पान:मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीला ‘सावाना’चा पुरस्कार; मंगळवारी नाशिकमध्ये अच्युत गोडबोले यांच्या हस्ते गौरव

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर