ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

घरी जुळ्यांचे आगमन अन् वनरक्षकावर काळाचा घाला:रस्त्यावरील खड्ड्याने घेतला बळी, आनंदी कुटुंबावर क्षणार्धात दुःखाचा डोंगर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रायगड जिल्ह्यातील रेवस-रेड्डी मार्गावर घडलेल्या भीषण अपघातात अलिबाग वनविभागातील वनरक्षक सुरज सारंगे यांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले होते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच काही तासांतच दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुरूड तालुक्यातील सर्वे गावचे रहिवासी असलेले सुरज सारंगे हे अलिबाग वनविभागाच्या तिनविरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी (६ मार्च) रात्री उशिरा ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रेवस-रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदून ठेवलेल्या खोल मोरीत त्यांची दुचाकी अचानक कोसळली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारीच त्यांच्या जुळ्या बाळांना हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आले होते. कुटुंबात नव्या पाहुण्यांच्या आगमनाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच झालेल्या अपघाताने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले. सारंगे यांनी या आनंदाचा क्षण आपल्या मोबाईल स्टेटसवरही व्यक्त केला होता. दरम्यान, रेवस-रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्या ठिकाणी बॅरिकेट्स, सूचना फलक, रेडियम पट्ट्या किंवा रात्री वाहनचालकांना दिसण्यासाठी लाल दिवे लावले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात असून संबंधितांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे. कर्तव्यदक्ष वनरक्षकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वनविभागातही शोककळा पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर