ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

डिझेल अभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळाचा मृत्यू:नातेवाईकांचा आरोप, आरोग्य प्रशासनाचा वेगळाच दावा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील गरोदर महिलेस वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खाजगी रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या वैद्यकिय महाविद्यालयात आणले मात्र येथे सिझेरीयन शस्त्रक्रियेनंतर बाळ दगावल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला तर दुसरीकडे डिझेल होते पण चालक नसल्याने अडचण झाल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे. रुग्णाचे नातेवाईक अन आरोग्य प्रशासनाच्या दावे प्रतिदाव्यामध्ये निष्पाप बाळाचा मात्र नाहक बळी गेल्याने तिव्र संतापाची भावना व्यक्त होऊ लागली आहे. नालेगाव येथील महिला मनिषा इंगळे ह्या दुसऱ्यांचा गरोदर होत्या. सात महिने झाले असतांना त्यांना अचानक पोटात त्रास होऊ लागला होता. त्यामुळे मंगळवारी ता. २६ त्यांना नालेगाव ते जवळाबाजार या पाच किलो मिटर अंतरापर्यंत दुचाकीवर आणण्यात आले. त्यानंतर जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. पुरजळकर यांनी महिलेची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने १०२ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र त्यांना डिझेल नसल्याचे सांगण्यात आले. तर १०८ क्रमाकांवरूनही तातडीने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिलेस खाजगी रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. हिंगोलीच्या वैद्यकिय महाविद्यालयात तपासणी केल्यानंतर मनिषा यांच्या गर्भाशयात प्रमाणापेक्षा जास्त पाणी असल्याने तातडीने सिझेरीयन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र यामध्ये बाळ दगावले. केवळ डिझेल अभावी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळ दगावल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. डिझेल होते पण चालक नव्हता – डॉ. गजानन चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी या घटनेची चौकशी केली असता रुग्णवाहिकेत डिझेल होते पण चालक नव्हता, मात्र १०८ रुग्णवाहिका पोहण्यातच होती. त्यापुर्वीच त्यांनी खाजगी रुग्णवाहिकेद्वारे महिलेस हिंगोलीला नेले. या शिवाय महिलेच्या गर्भाशयात प्रमाणपेक्षा जास्त पाणी झाले होते. बाळाला व्यंग असल्यानंतर हा प्रकार होतो. त्यामुळेच बाळाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी होणारच आहे. बालमृत्यूची होणार चौकशी – डॉ. कैलास शेळके जिल्हा आरोग्य अधिकारी हिंगोली या प्रकरणात बाल मृत्यूची चौकशी केली जाईल. तसेच जवळाबाजार येथे आरोग्य पथक पाठवून चौकशी केली जाणार असून त्या संदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय त्यांचा राहणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर