ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला:आर्द्रा नक्षत्रात बरसल्या सरी; अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात मुसळधार‎

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर सोलापूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे कमालीचा सुखावला आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यात रविवारी दुपारनंतर आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जूनचा शेवटचा आठवडा उजाडला तरी पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावले होते. मात्र, शनिवार पाठोपाठ रविवारीही पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. माळशिरस तालुक्यातील माळखांबी, चांदापुरी, बोरगाव, गिरझणी, निमगाव, माळशिरस, निकमवाडी, खुडूस, दत्तनगर, पिसेवाडी, वेळापूर, चव्हाणवाडी, घुमेरा, मेडद, चाकोरे, जांबूड, मगरवाडी, जळभावी आणि नातेपुते परिसर चिंब झाला आहे. करमाळा तालुक्यातील सालसे, हिसरे, पाथुर्डी, अर्जुननगर फाटा, आवाटी, हिवरे, निमगाव, गौंडरे, नेरले आदी परिसरात मुसळधार पाऊस झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर