ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पोलीस वर्धापन दिनानिमित्त मारेगाव येथे जनजागृती उपक्रम

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विद्यार्थ्यांना पोलीस कार्यप्रणाली व कायद्यांची माहिती

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून मारेगाव पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने समाजप्रबोधन व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, मारेगाव येथील विद्यार्थ्यांना पोलीसांच्या दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कार्यपद्धती, तक्रार नोंद प्रक्रिया, गुन्ह्यांचा तपास तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांची भूमिका याविषयी माहिती देण्यात आली. यासोबतच महिला विषयक कायदे, सायबर गुन्हे, गुड टच–बॅड टच, बालसुरक्षा, नवीन कायदे व कायद्यातील बदल यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन मदतीसाठी 112, महिलांसाठी 1091 व बालहेल्पलाईन 1098 या क्रमांकांची माहितीही देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवत कायद्याविषयीच्या शंका दूर केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढून पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

हा कार्यक्रम मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गावंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर बारेकर, कॉन्स्टेबल नामदेव भटारकर, कपिल जीवने, राजन इसलकर तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर