ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पुण्यात तरुणाच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा:मित्रांनी प्रवृत्त केले अन् व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला; शेजारी धावले मदतीला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील एका 20 वर्षीय तरुणाला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळे अटक करण्यात आली आहे. या तरुणाला त्याच्याच मित्रांनी या घोषणा देण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडिओ एडीट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यामुळे या घटनेतील गांभिर्य समोर येते. दरम्यान, या तरुणाच्या कुटुंबीयांना त्यांच्या हिंदू शेजाऱ्यांनी मदत करून त्यांना आधार दिला.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्या एका तरुणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुणे पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन रविवारी शहरातील झोपडपट्टी परिसरातून एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली. सदर तरुण कुटुंबातील एकटा कमावता व्यक्ती आहे. तो इलेक्ट्रिशियनचे काम करून आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा ओढतो. त्याला अटक झाल्यामुळे परिसरातील मुस्लिम कुटुंबांनी सोमवारचा इफ्तार रद्द केला. त्यामुळे शेजारच्या हिंदू कुटुंबांनी आरोपी तरुणाच्या कुटुंबाची बाजू घेत त्यांना आधार दिला. सदर तरुणाने थट्टा मस्करीत अशी घोषणाबाजी केली होती, असे ते म्हणाले. हिंदू शेजाऱ्यांनी घेतली बाजू आरोपीचे कुटुंब व शेजाऱ्यांच्या मते, तो तरुण चांगला आहे. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो सकाळी कामाला जातो आणि सायंकाळी घरी आल्यानंतर आईची मदत करतो. त्याची वर्तणूक वाईट असती तर आम्हीही त्याला शिक्षा देण्याची मागणी केली असती, पण तो चांगला मुलगा आहे. त्याच्याकडून अनावधानाने चूक झाली. आमच्या परिसरात हिंदू व मुस्लिम सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. एका बांधकाम साईटवर काम करत असताना त्याला त्याच्या मित्रांनी सदर घोषणा करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर त्याचा व्हिडिओ एडिट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याने त्याच्या कृत्यासाठी अगोदरच माफी मागितली आहे. संघटनेच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल पुणे झोन-2 चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी याविषयी सांगितले, सदर तरुण बांधकाम साईटवर काम करत असताना त्याच्या सहकाऱ्याने हा व्हिडिओ चित्रीत केला. व्हायरल व्हिडिओचा तपास केला जात आहे. या व्हिडिओत तो तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताना दिसून येत होता. एका संघटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 192 व 196 (1) नुसार दोन गटात शत्रुत्व निर्माण करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या निधनानंतर शिक्षण सोडून काम करण्याची वेळ उल्लेखनीय बाब म्हणजे आरोपी तरूणाच्या वडिलांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याचा मोठा भाऊ दिव्यांग आहे. त्यामुळे त्या तरुणाला आपले शिक्षण अर्धवट सोडून कामावर जावे लागले. बांधकाम साईटवर तो इलेक्ट्रिशियनचे काम करतो. तरूणाची आई घरकाम करते. आरोपीच्या आईने सांगितले की, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, माझ्या मुलाला तसे बोलण्यास भाग पाडले आहे. त्याच्या विधानाचे काय परिणाम होतील, याचा त्याला अंदाजही नाही. तो अजून लहान आहे. त्याने माफी मागितली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर