ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

व्यावसायिक केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नव्हे, खून:होणाऱ्या पत्नीने मित्रांच्या मदतीने केली हत्या, पुणे ग्रामीण पोलिसांचा खुलासा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन विशाल अगरवाल (वय 25) या तरुण उद्योजकाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव अखेर उघडकीस आला आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने त्याला किल्ल्यावरून ढकलून देऊन त्याचा खून केल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया प्रवीण गोयल (वय 20) आणि तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी (वय 22) या दोघांना अटक केली आहे अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली आहे. अपघाताचा बनाव ठरला अपयशी मृत केतन अगरवाल (रा. लोढा बेलमँडो टॉवर, गहुंजे, मावळ) याचे पुणे येथील सिया गोयल हिच्याशी लग्न ठरले होते. 18 जून 2026 रोजी दोघे लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास किल्ल्याच्या पश्चिम बाजूकडील दरीतील झुडपांमध्ये केतनचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी सियाने पोलिसांना सांगितले की, फिरताना पाय घसरल्याने केतनचा दरीत पडल्यामुळे मृत्यू झाला. या माहितीवरून लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सखोल तपासातून खुनाचा कट उघड घटनेची संशयास्पद पार्श्वभूमी पाहता, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. पोलिस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी सुरू केली असता, सियाचे कोंढवा येथील चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. केतन हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने सिया आणि चेतनने त्याला कायमचे संपवण्याचा कट रचला. कटाप्रमाणे सिया केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. तिने तिचा प्रियकर चेतनला तेथे पाठीमागून बोलावून घेतले आणि दोघांनी मिळून केतनला पाठीमागून दरीत ढकलून दिले. केतनचे वडील विशाल देवीचंद अगरवाल (वय 46) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103 आणि 61(2) अन्वये खुनाचा आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत आरोपी चेतन बाबूलाल चौधरी (रा. पार्श्वनगर, कोंढवा बु.) आणि सिया प्रवीण गोयल (रा. लिलाकुंज, न्यू एरा सोसायटी, गंगाधाम समोर, बिबवेवाडी) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित सावंत, मनोज पवार आणि पोलिस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर