ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नसरापुरात चिमुकलीसोबत नेमके काय घडले?:पोलिसांनी कुणालाही कळू न देता आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले; सीन रिक्रिएट केला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील नसरापुरात एका साडे 3 वर्षीय मुलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अचानक आरोपीला घटनास्थळी नेऊन प्रस्तुत घटना कशी घडली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून गुन्ह्याची खडानखडा माहिती घेऊन पोलिस आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पु्ण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे गत 1 मे रोजी भीमराव कांबळे नामक आरोपीने साडेतीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाखाली लपवला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कुणालाही थांगपत्ता न लागू देता आरोपीला प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून मृत चिमुकली कुठे खेळत होती? तिला कुठून सोबत घेतले? व गाईच्या गोठ्यात कसे आणले? या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. त्यात काही नवी माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा केला जात आहे. ही माहिती उद्या 7 मे रोजी पोलिसांकडून कोर्टात सादर केली जाण्याची शक्यता आहे. कारण, आरोपीची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे पोलिस त्याला उद्या कोर्टात सादर करणार आहेत. यावेळी पोलिसांकडून आरोपीची पुन्हा कोठडी मागितली जाण्याचीही शक्यता आहे. चिमुकली सुट्ट्यांमध्ये आली होती आजीकडे मृत चिमुकली पुण्यात आपल्या आई-वडिलांसोबत राहते. पण सध्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे ती नसरापूर येथे आपल्या आजी-आजोबांकडे आली होती. ती आपल्या आजीच्या कुशीत आनंदाने बागडत होती. ही घटना घडली त्या अगोदर 4 दिवसांपूर्वीच तिचे आई – वडील तिला भेटण्यासाठी आले होते. आपल्या चिमुकलीला खेळायला मिळावे म्हणून त्यांनी तिला एक छान ‘टेडी बेअर’ भेट दिला होता. घटनेच्या दिवशी ती एकटीच त्याच टेडी बिअरसोबत खेळत होती. त्याचा गैरफायदा नराधमाने घेतला. ज्या वयात तिला स्पर्शाची जाणीवही नव्हती, त्याच वयात तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला आणि तिची हत्या केली गेली. आरोपीने 1 मे रोजी तिची बलात्कारानंतर दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी तिचा प्राथमिक शवविच्छेदन अहवालाही समोर आला आहे. त्यात आरोपीने चिमुकलीच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबून अत्याचार केल्याचा व त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीवर जोरदार बुक्की मारल्याचे निष्पन्न झाले आहे. घटना घडली त्याच गोठ्यात आरोपीचे वास्तव्य प्रस्तुत घटना ज्या गोठ्यात घडली त्याच गोठ्यात आरोपी काही दिवसांपासून राहत होता. तिथे त्याचे कपडे व इतर साहित्यही आढळले आहे. त्याला तेथील एकेठिकाणी विटा उचलण्याचे काम मिळाले होते. त्याने सलग 3 दिवस हे काम केले. हे काम संपताच त्याने चिमुकलीला गोठ्यात आणले व तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. तत्पूर्वी, त्याने तिला गाठी शेव खाण्यास दिल्याचीही चर्चा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर