ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत:अमित साटम यांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला, उर्वरित 77 जागांवर लवकरच निर्णय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून 150 जागांवर एकमत झाल्याचे भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाचा देखील फॉर्म्युला अमित साटम यांनी यावेळी सांगितला. मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अमित साटम म्हणाले, ज्या 77 उर्वरित जागा आहेत, त्या उर्वरित जागांची चर्चा आमची सुरू आहे. एकमेकांना आकडेवारी देणे, ही सगळी प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पार पडेल आणि मग आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यानंतर याची जी काही घोषणा असेल ती होईल. 227 जागांवर महायुती लढेल अमित साटम यांना जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जागावाटपाचा फॉर्म्युला आहे आहे की या मुंबईच्या महानगपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन द्यायचे आहे. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचे आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे. मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपाइं ही महायुती कटिबद्ध आहे. त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचे नाही. 227 जागांवर महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महापालिकेमध्ये विराजमान होईल. जेणेकरून येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन देणे, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित ठेवणे आणि काही लोक मतांच्या लांगूलचालनासाठी या मुंबईचा रंग बदलण्याचे काम करत आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्यावर आमचे एकमत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्याकडे देण्याचे ठरवले आहे. मतांच्या लांगूलचालनासाठी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न पुढे बोलताना अमित साटम म्हणाले, आमचे सूत्र हेच आहे की मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करणे. ज्या लोकांनी 25 वर्ष बसून मुंबई महापालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला, मुंबई विकून खाल्ली आणि आता स्वतःचे संपलेले राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जीवंत करण्यासाठी, मतांच्या लांगूलचालनासाठी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडणे हे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी महायुती यांना परास्त करण्यासाठी सज्ज आहे. उर्वरित 77 जागांवर आमची चर्चा सुरू शिवसेना शिंदे गट किती जागा लढणार आणि भाजप किती जागा लढणार? या प्रश्नावर उत्तर देताना अमित साटम म्हणाले, 150 जागा ही महायुती लढणार आहे. भाजप, शिवसेना आणि रिपाइं महायुती 227 जागा लढणार आहे. त्यात 150 जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित 77 जागांवर आमची चर्चा सुरू असून लवकरच पुढील 2-4 दिवसात या जागा घोषित होतील. तसेच आमच्यासाठी कोणता पक्ष किती जागा लढवणार हे महत्त्वाचे नाही. महायुती 227 जागा लढवेल हे महत्त्वाचे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर