ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

परीक्षा हॉलमध्ये घुसून दहावीच्या विद्यार्थिनीला मारहाण:बीडच्या डोईठाण केंद्रावरील घटना; तरुण फरार, भयभीत विद्यार्थिनीची रडारड

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीला एका तरुणाने थेट परीक्षा हॉलमध्ये घुसून मारहाण केल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर घडली आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित विद्यार्थिनीही भीतीने गारठून गेली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील परीक्षा वरील घटना घडली आहे. या परीक्षा केंद्रावर बीडसांगवी येथील शाळेतील विद्यार्थिनी परीक्षेसाठी आल्या होत्या. सकाळी 10.45 च्या सुमारास सर्व विद्यार्थी आपापल्या जागी जाऊन बसले. तेवढ्यात देसूर येथील एका तरुणाने अचानक परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला. त्याने हॉलमध्ये परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीला काही कळण्याच्या आत मारहाण करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट परीक्षा नियंत्रक व तेथील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येण्याअगोदरच आरोपी तरुणाने तेथून तत्काळ पळ काढला. हल्लेखोर तरुण हॉलपर्यंत पोहोचलाच कसा? अचानक घडलेल्या या घटनेमुळे पीडित विद्यार्थिनी प्रचंड भयभीत झाली. तिला परीक्षा केंद्रातच रडू कोसळले. तिने घडलेला सर्व प्रकार केंद्र संचालक व तिथे उपस्थित असलेल्या शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शाळा प्रशासनाने तत्काळ पीडित विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावू झाल्या प्रकाराची माहिती दिली. विशेष म्हणजे परीक्षा मंडळाने यंदा राज्यभरातील परीक्षा केंद्रावर मुबलक पोलिस बंदोबस्त केला आहे. त्यानंतरही हल्लेखोर तरूण थेट हॉलपर्यंत पोहोचलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासन काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दहावीच्या गणिताचे पेपर फुटल्याचे उघड दुसरीकडे, दहावीच्या गणित भाग -1 व गणित भाग – 2 या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रश्नपत्रिका टेलिग्रामच्या एका ग्रुपवर परीक्षेपूर्वीच आढळल्या होत्या. पुणे विभागीय मंडळाला या संशयास्पद प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपासणी केली. या तपासणीत ग्रुपवर आलेल्या प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिका एकसारख्याच असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे विभागीय मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 6 मार्च रोजी झालेला गणित भाग 1 चा पेपर 5 मार्च रोजी रात्री 8 वाजून 37 मिनिटांनी ग्रुपवर टाकण्यात आला होता. त्याहून धक्कादायक म्हणजे 9 मार्च रोजी झालेला गणित भाग 2 चा पेपर चक्क 6 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजून 56 मिनिटांनीच ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता. बीड बस स्थानकात तरुणींनी सादर केली लावणी दुसरीकडे, बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकात गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास अचानक 3 मुलींनी लावणीवर ठेका धरला. त्याचे झाले असे की, बाल नृत्य कलाकार वैभवी टाखनकार व तिच्या दोन मैत्रिणी कुटुंबासोबत बीडहून माजलगावाकडे आपल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकावर थांबल्या होत्या. रात्रीचे 8 वाजले होते. सर्व प्रवाशी बसच्या प्रतिक्षेत होते. त्यावेळी या प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी या तिन्ही बाल कलाकारांनी अचानक लावणीच्या गाण्यावर ठेका धरला. गर्दीने गजबजलेल्या स्थानकात अचानक या बालकलाकारांनी ठेका धरल्यामुळे सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. त्यांच्या नृत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर