ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सुनेत्रा पवारांच्या आग्रहामुळेच काँग्रेसची बारामतीतून माघार:हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या निर्णयानंतरही राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असल्याचे दिसून येत आहे. सपकाळ यांनी सांगितले की, या निर्णयामागे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांचा मोठा प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 5 एप्रिलपासूनच संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर काल आणि आजही त्यांनी फोन करून पुन्हा आग्रह धरला. याशिवाय छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसेच अजित पवार गटातील इतर नेत्यांनीही काँग्रेसकडे माघारीची विनंती केली होती. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडत भावनिक दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन केले होते. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा झाली आणि शेवटी माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सपकाळ यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काँग्रेसची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची योग्य चौकशी व्हायला हवी. एफआयआर दाखल होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 23 एप्रिल रोजी मतदान, 4 मे रोजी निकाल बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार म्हणून आकाश मोरे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता मुख्य लढत टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असून काँग्रेसच्या माघारीनंतर त्यांचा मार्ग सुकर होण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर