ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बाहेर हिंदू-मुस्लिम चर्चा, पण बिलात काहीच नाही:विधेयकाचा एका धर्माला त्रास झाला तर सर्वांनाच होणार- भास्कर जाधव

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे जर मुस्लीमांना त्रास होणार असेल तर तो हिंदूंना, बौद्धांना,जैन, पारशी, शीख आणि ख्रिश्चनांनादेखील होईल, अन् होणार नसेल तर कोणालाही होणार नाही, पण कालचे बिले हे सर्व धर्मांना त्रास देणारे आहे असे उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आणि त्याचबरोबर शिवसेनेची भूमिका म्हणून मी त्यालार पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेची भूमिका म्हणून आम्ही त्यांचे समर्थन केले आहे, त्यातून सरकारची लबाडी आमच्या तात्काळ लक्षात आली होती. आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही ती तात्काळ लक्षात आली. बाहेर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांचे उथळ वक्तव्य करणारे काही लोकं पाळले गेले आहेत त्यांच्याकडून हे मुस्लीमांच्याविरोधात आणि हिंदूच्या रक्षण करणारे विधेयक आहे अशा चर्चा घडवल्या जात होत्या. प्रत्यक्षात बिलामध्ये कुठेही तसे काहीही नाही. त्यामुळे राडा करायला संधी मिळाली भास्कर जाधव म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांकडून काल एक शब्द चुकीचा गेला तो जायला नको होता. त्याचे मी समर्थन करणार नाही. त्यांना त्यांचवेळी मी माफी मागायला सांगत होतो पण सत्ताधारी पक्षाला जे अपेक्षित होते, त्यांना या बिलच्या माध्यमातून सभागृहात हिंदू-मुस्लीम प्रकारची राडेबाजी करायची होती, ते करायला संधी मिळाली. जितेंद्र आव्हाडांच्या एका वाक्यामुळे सत्ताधाऱ्यांना सभागृहात राडा घालायला संधी मिळाली हे खरे आहे. त्यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो भास्कर जाधव म्हणाले की, अबु आझमी या बिलाबद्दल काय म्हणता यावर बोलणे मला काही महत्त्वाचे वाटत नाही. पण या बिलामुळे टार्गेट झाले तर सर्वच धर्म टार्गेट होतील, नाहीतर कुणीच टार्गेट होणार नाही. दोन धर्मातील मुले-मुली लग्न करू इच्छित असतील तर त्यांना 60 दिवस आधी अधिकाऱ्याला सांगावे लागेल. असे लग्न लपवाछपवी करत होत असतात. यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो, हे एका धर्मासाठी नाही तर सर्वच धर्मांसाठी त्रासदायक होऊ शकते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर