ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची – ठाणेदार मिलिंद सरकटे

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी तालुक्यातील पाटण पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील दिनानिमित्त स्नेह मिलन सोहळा, मार्गदर्शन शिबिर व निरोप समारंभ पाटणआई देवस्थान, माथार्जुन येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे हे होते, तर पीएसआय नागोराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त पोलीस पाटील विजय भोयर, माथार्जुन ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र कायतवार तसेच पत्रकार योगेश मडावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात मान्यवरांनी पोलीस पाटीलांची गावपातळीवरील महत्त्वपूर्ण भूमिका, प्रशासन व नागरिकांमधील दुवा म्हणून असलेले योगदान तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटीलांचे मोलाचे कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी प्रशासनाशी योग्य समन्वय राखून समाजात शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस पाटीलांनी अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले. तर पीएसआय नागोराव जाधव यांनी पोलीस पाटीलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी सेवानिवृत्त पोलीस पाटील विजय भोयर (डोरली) व त्यांच्या पत्नीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तसेच पोलीस प्रशासनातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर