ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वाघोलीत खिडकीचे गज कापून 2 लाखांचे दागिने लंपास:चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, हडपसरमध्येही एकाला लुटले

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाघोली येथे चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून घरातून सुमारे 1 लाख 98 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. तर हडपसरमध्ये घराबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील मोबाईल आणि रोकड लुटण्यात आली. दोन्ही घटनांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाघोलीतील माळवाडी परिसरात ही घटना घडली. तक्रारदारांचे घर 19 जून रोजी बंद होते. चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील 1 लाख 98 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही चोरी 22 जून रोजी उघडकीस आली, त्यानंतर वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक वैजनाथ केदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसरी घटना हडपसरमधील माळवाडी परिसरात, अन्नपूर्णा हॉटेलमागे घडली. 20 जून रोजी रात्री तक्रारदार घरासमोरील ओसरीवर झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांना झोपेतून उठवून मारहाण केली. त्यांच्याकडील 7 हजार 840 रुपये किमतीचा मोबाईल आणि रोकड लुटून चोरटे पसार झाले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड अधिक तपास करत आहेत. संगीत शिक्षकाची दुचाकी चोरली – जीपीएस यंत्रणेद्वारे दुचाकीचा शोध प्रभात रस्ता परिसरातून एका संगीत शिक्षकाची दुचाकी चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. दुचाकीला ‘जीपीएस’ यंत्रणा असल्याने शिक्षकाने स्वत: दुचाकी शोधून काढली. बिबवेवाडी परिसरात दुचाकी सापडली. चोरट्याने दुचाकीचे काही भाग चोरुन नेले. याबाबत एका संगीत शिक्षाकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे प्रभात रस्ता परिसरात राहायला आहेत. पहाटे बंगल्याच्या आवारात लावलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली. दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दुचाकीला जीपीएस यंत्रणा असल्याने त्यांनी दुचाकीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा दुचाकी बिबवेवाडी परिसरात लावल्याची माहिती मिळाली. दुचाकीचा शोध त्यांनी घेतला. चोरटा बिबवेवाडीत दुचाकी सोडून पसार झाल्याचे उघडकीस आले. चोरट्याने दुचाकी लावलेल्या पिशवीतून तांब्याचे भांडे चोरुन नेल्याचे उघडकीस आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर