ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मनसेचे मुंबईतील उमेदवार ठरले:बाळा नांदगावकर, सरदेसाई बंद लिफाफा घेऊन राज ठाकरेंच्या घरी; उद्यापासून AB फॉर्मचे वाटप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत. उमेदवारांच्या नावांचा बंद लिफाफा घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे उद्यापासून आपल्या एबी फॉर्मचे वाटप करेल. त्यानंतर लगेचच उमेदवार अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतील. तसे संदेशही मनसेतर्फे आपल्या कार्यकर्त्यांना गेलेत. मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आज सकाळपासून सुरू होती. या बैठकीत मुंबईतील जागावाटप व उमेदवारांची नावे जवळपास फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई व बाळा नांदगावकर हे दोन्ही नेते एक बंद लिफाफा घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेत. या बंद लिफाफ्यात मनसे उमेदवाराची यादी असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे आज रात्रीपासूनच आपल्या उमेदवारांना योग्य ते संदेश पाठवेल. त्यानंतर उद्या सकाळपासून सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले जाईल. तूर्त राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेच्या उमेदवारांच्या नावांवर शेवटचा हात फिरवला जाईल. दादरची जागा मनसेच्या वाट्याला? दुसरीकडे, ठाकरे गटासोबतच्या जागावाटपाच्या चर्चेत दादर वॉर्ड कर्मांक 192 ची जागा मनसेला सुटल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी मनसे नेते यशवंत किल्लेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी माहिती आहे. 2017 च्या निवडणुकीत या वॉर्डातून ठाकरे गटाच्या प्रती पाटणकर विजयी झाल्या होत्या. पण आता वाटाघाटीत हा वॉर्ड मनसेच्या ताब्यात घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी याविषयी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार आहेत. यात माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांचाही समावेश आहे. महायुतीचे उद्या जागावाटप दुसरीकडे, सत्ताधारी भाजप व शिवसेनेचे जागावाटप उद्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाईल. या प्रकरणी आज रात्री शिवसेना समन्वय समितीच्या नेत्यांची एक बैठक एकनाथ शिंदे यांच्यासोबत होईल. या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांवरील उमेदवार निश्चित केले जातील. त्यानंतर या उमेदवारांना उद्यापासूनच एबी फॉर्मचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. पक्षातील संभाव्य बंडखोरी टालण्यासाठी उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर केली जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हे ही वाचा… इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरुपी सत्ता नाही:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात; संधी सर्वांना मिळते म्हणत दिला सूचक इशारा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्रयत्न झाला. आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. आज तुमचा दिवस आहे. उद्या आमचा येील. इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरुपी सत्ता नाही. सत्तेचा मुकूट कायम बदलत असतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर