ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजित पवार विमान अपघात प्रकरण:’AAIB’च्या अहवालाशिवाय निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, न्यायालयाने काय म्हटले?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करणाऱ्या दोन याचिका याचिकाकर्त्यांनी मागे घेतल्या आहेत. कारण जोपर्यंत या प्रकरणात ‘एएआयबी’चा (AAIB) अंतिम अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मात्र, संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर याचिकाकर्त्यांना याप्रकरणी न्यायालयात पुन्हा नव्याने दाद मागण्याची मुभा असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दोन महिन्यांत अहवाल सादर न केल्यास… जोपर्यंत ‘एएआयबी’ (AAIB) दिल्लीचा अंतिम अहवाल प्राप्त होत नाही आणि तपासाचे निष्कर्ष समोर येत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणी आम्ही कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणावर पुढील विचार केला जाईल, अशी भूमिका न्यायालयाने घेतल्याने, आता आम्ही ‘एएआयबी’कडे पाठपुरावा करणार असून, त्यांनी दोन महिन्यांत अहवाल सादर न केल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात धाव घेऊ, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर