ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

विधानभवनासह मुंबईतील चार ठिकाणांना मिसाईल-बॉम्बची धमकी:मुंबई टार्गेटवर? विधानभवन, मेट्रो, शेअर बाजार उडवण्याची धमकी; यंत्रणा हायअलर्टवर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेला मोठा धक्का देणारी घटना घडली. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या एका ई-मेलमध्ये महाराष्ट्र विधानभवन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सकाळी एकच खळबळ उडाली. हा मेल मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला विधानभवनातील कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आले. त्यानंतर ओळखपत्र तपासणी आणि सुरक्षा पडताळणीनंतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने आत सोडण्यात आले. या घटनेबाबत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सकाळी सुमारे 6 वाजून 57 मिनिटांनी सीपीएच्या अधिकृत मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्या मेलमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना बॉम्ब आणि मिसाईलद्वारे हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने त्वरित तपास सुरू करत संपूर्ण परिसराची पाहणी केली. या धमकीत केवळ विधानभवनाचाच उल्लेख नसून मुंबईतील आणखी चार महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई मेट्रो आणि एका बँकेचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या सर्व ठिकाणांना मिसाईल आणि बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलमध्ये नमूद करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ खबरदारी घेत विविध संवेदनशील भागांमध्ये सतर्कता वाढवली. राम शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व माहिती लगेच सार्वजनिक करणे योग्य ठरणार नाही. मात्र संबंधित यंत्रणा सतर्क असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. सुरुवातीच्या तपासात धमकीचा मेल खलिस्तानी आंदोलनाशी संबंधित असण्याची शक्यता समोर आली असल्याची माहितीही मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून सखोल तपास सुरू दरम्यान, या घटनेनंतर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलिस आणि विशेष सुरक्षा पथकांनी विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानभवन परिसरात अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. धमकी देणारा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर