ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा लग्नमुहूर्त ठरला:पवार कुटुंबात सोहळ्याची लगबग; रेवती सुळे 20 जूनला विवाहबंधनात, हाय-प्रोफाइल लग्न

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20 जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहसोहळ्यामुळे पवार कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तयारीलाही वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईतील एका प्रतिष्ठित ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील आणि देशातील अनेक नामांकित राजकीय नेते, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार आणि लखानी कुटुंबीयांकडून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक गोष्ट विशेष ठरणार असल्याचे बोलले जात आहे. विवाहानंतरही विविध ठिकाणी स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिला रिसेप्शन मुंबईत पार पडेल, तर वरपक्ष नागपूरचा असल्याने तेथेही खास कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, पवार कुटुंबाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेता दिल्लीतही एक भव्य स्वागत समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक न राहता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही चर्चेचा विषय ठरणार आहे. सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग हे केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असून ते एक कुशल बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विवाह जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जाते. पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण रेवती सुळे यांनीलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले सुप्रिया सुळे यांना आहेत. आता रेवती सुळे यांच्या विवाहामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून हा सोहळा राज्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर