ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भोंदू बाबाचा विधवा महिलेवर बलात्कार:स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच केला अत्याचार; नांदेडची मन सुन्न करणारी घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एका विधवा महिलेशी वर्षभर लैंगिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्या एका कथित मठाधिपतीच्या नांदेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित महिला ज्या व्यक्तीला गुरू माणून श्रद्धेने शरण गेली, अखेर त्यानेच तिचा घात केला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीडित विधवा महिला मे 2025 मध्ये पहिल्यांदा नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील एका मठात गेली होती. तिथे तिची ओळख हरिगिरी महाराज यांच्याशी झाली. पीडिता दर गुरूवारी मोठ्या श्रद्धेने या मठात दर्शनासाठी येत होती. तिने हरिगिरी महाराजांना आपले गुरू मानले होते. पण या भोंदू महाराजाची तिच्यावर वाईट नजर होती. तो सतत तिला फोन करून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्यात त्याला यश आले. वाढदिवसाच्या दिवशीच केला बलात्कार हरिगिरी महाराजांचा 14 जुलै 2025 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने तो स्वतः पीडित महिलेच्या घरी गेला. तिथेच त्याने पहिल्यांदा महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कुणालाही न सांगण्यासाठी त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. पण त्यानंतर महिलेने लग्नाचा तगादा लावताच तो तिला टाळू लागला. मी संन्यासी असल्यामुळे लग्न करू शकत नाही, असे म्हणत आपले हात वर करू लागला. यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर तत्काळ तिने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर झालेल्या चौकशीत पोलिसांनी भोंदू हरिगिरी महाराजाच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर नांदेडमध्ये हे प्रकरण समोर आल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. काय आहे अशोक खरात प्रकरण? नाशिकच्या अशोक खरात नामक भोंदू बाबाने महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. या प्रकरणी सध्या अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नुकताच या प्रकरणात राजीनामाही द्यावा लागला आहे. हे ही वाचा… IG दत्तात्रय कराळेंनी अशोक खरातला पाठिशी घातले:तृप्ती देसाई यांचा आरोप; भोंदू खरातचे प्रकरण गतवर्षीपासून दाबले जात असल्याचा दावा
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर