ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

विश्वासघात हा उबाठा अन् राऊतांचा डीएनए:शरद पवारांबाबत निर्णय भाजप नाही तर सुनेत्रा पवारच घेतील, राऊतांवर नवनाथ बनांची टीका

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संजय राऊत यांना विश्वास शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही, कारण त्यांनी उभ्या हायातील कुणावरही विश्वास ठेवला नाही. विश्वासघात करणे हा उबाठा आणि संजय राऊत यांचा डीएनए आहे, असे म्हणत
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांसह उबाठावर टीका केली आहे. नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार यांना सोबत घ्यायचे का नाही हा निर्णय देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप घेणार नाही हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि त्यांचे नेते ठरवतील. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे पद आलेले आहे. त्या योग्य तो निर्णय घेतील. राऊतांना दोन भावाचे विलीनीकरण करता आले नाही, दोन भावांना एकत्र ठेवता आले नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर बोलू नये. पवार एनडीएत जातील अशी राऊतांना भीती नवनाथ बन म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणाचा प्रश्न हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगत आहे. हे गेले अनेक दिवस आम्ही सांगत होतो आज त्यांना याबद्दल समजले. शरद पवार हे एनडीएमध्ये जातील का भीती संजय राऊत यांना वाटू लागली आहे. म्हणून ते अंतर्गत प्रश्न आहे असे ते म्हणत आहेत. आम्ही पहिल्यादिवसांपासून सांगत आहोत की सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. मविआचे अस्तित्व संपले नवनाथ बन म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीवेळी राज्यात मविआ फुटली होती. आता पण मविआमध्ये काँग्रेस, शरद पवार यांचा पक्ष आहे का? हा आमचा सवाल आहे. उद्धव ठाकरे हे तरी मविआमध्ये आहेत का आमचा सवाल आहे. मविआचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. मनपाच्या निवडणुकीत मविआ औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. जनतेने त्यांचा जो पराभव केला त्यावरुन असे वाटते की येणाऱ्या काळात मविआ नसेल. शरद पवार हे देखील मविआचे घटक असतील का हा सुद्धा प्रश्न आहे. दादांचा फडणवीसांवर विश्वास होता नवनाथ बन म्हणाले की, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे का नाही हे महाराष्ट्रतील जनतेने पाहिले आहे. संजय राऊत, उबाठा, आणि शरद पवार यांना सोडून अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ओल ते विश्वासापोटी आले. सकाळचा शपथविधी सुद्धा त्याच विश्वासातून झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवारांची साथ सोडत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला होता. राऊतांनी विश्वास शब्द उच्चारू नये कारण त्यांनी महाराष्ट्राचा विश्वास घात करत जनतेना लुटण्याचे काम उबाठामार्फत करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर