ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस?:उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची तातडीची बैठक, मातोश्रीवर खलबतं सुरू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलवल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच पक्षांतर्गत नाराजी असल्याचे देखील बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असल्याचे समजते. दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची माहिती मिळत असून, यावेळी खासदारांनी थेट वरिष्ठ नेत्यांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना पुरेसा वेळ देत नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून अपेक्षित असलेले पाठबळ किंवा मदत मिळाली नाही, अशा शब्दांत खासदारांनी आपली उघड नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या बैठकीत खासदारांनी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे समजते. जर उद्धव ठाकरेंना प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत? असा सवालही खासदारांनी विचारला होता. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आज उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. आता या बैठकीतून सध्यातरी सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर