ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नाशिकमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे 19 पासून बेमुदत कामबंद‎:मंत्र्यांकडून होणाऱ्या विनाचौकशी निलंबनाच्या कारवाईवर आक्षेप, संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शासनाकडून कंप्युटरसह अत्याधुनिक‎ संसाधने दिली जात नसल्याने तलाठ्यांनी‎ ऑनलाइन कामकाज बंद केले असताना आता महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १९ ‎डिसेंबरपासून राज्यभर आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला आहे. विनाचौकशी होणाऱ्या‎ निलंबनाच्या घोषणांमुळे तसेच महसूल ‎विभागाच्या दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक व सेवा‎विषयक मागण्यांचा निपटारा न झाल्याने‎ राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व‎कर्मचारी समन्वय महासंघाच्या वतीने‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले‎ आहे. कुठलिही तक्रार झाली तर चौकशी न‎करताच महसूल मंत्र्यांकडून थेट‎ विधिमंडळातच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या‎निलंबनाच्या घोषणा केल्या जातात.‎ अधिकारी-कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली‎ जात नसल्याने त्यांच्यामध्ये भीती व तणावाचे‎वातावरण निर्माण झाले आहे. नैसर्गिक न्यायाने‎ कारवाई व्हावी अशी अपेक्षा या अधिकारी ‎कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. निलंबन आदेश मागे घेण्याची मागणी‎ १२ डिसेंबर २०२५ रोजी विधानसभेत कोणतीही‎चौकशी न करता ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी‎व २ ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा‎करण्यात आली. त्यानंतर १३ डिसेंबरला भंडारा‎जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार‎तसेच पालघर जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व ग्राम‎महसूल अधिकाऱ्यांवरही कारवाई जाहीर करण्यात‎आली. ही कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना‎विरोधात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.‎या सर्व निलंबन आदेश तत्काळ मागे घ्यावेत, अशी‎मागणी करण्यात आली आहे. वर्षभरात ५६ जणांवर कारवाई‎ जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत २८ नायब‎तहसीलदार-तहसीलदार, ४ उपजिल्हाधिकारी,‎८ मंडळ अधिकारी, १४ ग्राम महसूल अधिकारी‎व इतर कर्मचाऱ्यांवर निलंबन व गुन्हे दाखल‎करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे‎महसूल अधिकारी व कर्मचारी प्रचंड मानसिक‎तणावाखाली काम करत असल्याचे संघटनांचे‎म्हणणे आहे. याबाबत संघटनेच्या वतीने‎मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून त्यात‎तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला ‎आहे.‎ राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी संघाच्या प्रमु ख मागण्या अशा‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर