ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाच्या जखमेचे रहस्य काय?:कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? शरद पवार गटाचा तिखट सवाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाचे रहस्य काय? भोंदू अशोक खरातच्या नादी लागू कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? असा तिखट सवाल शरद पवार गटाने या प्रकरणी सुनील तटकरेंना केला आहे. भोंदू अशोक खरात व त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची शरमेने मान खाली गेली आहे. या प्रकरणी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदू खरातच्या सांगण्यानुसार अनामिका कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर असेच आरोप केलेत. सुनील तटकरेंनी आपल्या हाताचा अंगठा अशोक खरातच्या सूचनेनुसार रक्ताचा अभिषेक करण्यासाठी कापला होता का? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. कुणी तर्जनी, तर कुणी अंगठा कापून घेतला विकास लवांडे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, अहो सुनील तटकरे साहेब तुमच्या फोटोमध्ये बोटाच्या जखमेचे रहस्य काय आहे? लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरातच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला होता का? कुणी तर्जनी कुणी अंगठा कापून घेतला आहे. काय भानगड कळत नाही. जरा खराखुरा खुलासा होऊ द्या साहेब. आपण ज्येष्ठ नेते आहात बिनधास्त बोला साहेब. त्या अशोक खरातची कॅप्टन फाईल असली तरी तुम्हाला कसली भीती? तुम्ही खरं खरं बोलाच. महाराष्ट्र वाट बघतोय. हिंदूत्ववादी संघटनांवरही साधला निशाणा विकास लवांडे यांनी यावेळी अशोक खरातच्या मुद्यावर मौन बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांवरही निशाणा साधला. लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात ज्याने हिंदू धर्मातील अनेक महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले , फसवणूक केली. अशोक खरात हा एकमेव नाही असे अनेक भोंदू बाबा महाराष्ट्रात आणि देशात आहेत जे सर्वसामान्य लोकांचे आणि महिलांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषण करत असतात. मात्र या विषयावर आरएसएस परिवारातील तथाकथित हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, भिडेंचे धारकरी आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार नितेश राणे,आमदार संग्राम जगताप हिंदू जन आक्रोश मोर्चा कधी काढणार आहात की नाही? फक्त आरोपी परधर्मीय असेल तरच मोर्चे काढणार? उघडा डोळे बघा नीट, असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारेंनी चाकणकरांवर केले होते असेच आरोप दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर असेच आरोप केले होते. त्या एका पीडितेचा दाखला देत म्हणाल्या होत्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. त्याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे, असे अंधारे म्हणाल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर