ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पकडला गेला तरच ‘भोंदू’ का?:भक्तांच्या आंधळेपणाचे काय? डोळस श्रद्धा की वैचारिक गुलामगिरी? नाशिकच्या खरात प्रकरणावरून अतुल कुलकर्णींचा सवाल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्वत:ला देवाचा अवतार सांगून महिलांचे शोषण करणारा भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात सध्या गजाआड आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले असून, यात अनेक बडे नेते आणि हस्तींचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती करत समाजाला आरसा दाखवला आहे. अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला पहिलाच प्रश्न काळजाला भिडणारा आहे. ते विचारतात, एखादा बाबा पकडला गेला कीच त्याला ‘भोंदू’ का म्हणायचे? त्याआधी तो काय असतो? आणि जे कधीच पकडले जात नाहीत, त्यांचे काय? हा प्रश्न केवळ खरातपुरता मर्यादित नसून, गल्लीबोळात उभे राहिलेल्या स्वयंघोषित महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.

अंध होण्याला कारणीभूत कोण? अतुल कुलकर्णी म्हणाले की, जेव्हा एखाद्या महाराजाचे काळे कारनामे चव्हाट्यावर येतात, तेव्हा त्याचे अनुयायी स्वतःला ‘पीडित’ मानतात. पण , हे भक्त नेमके कोण असतात? भागीदार, पीडित, अंधळे, अंधश्रद्धाळू की मूर्ख?अंध होण्याला कारणीभूत कोण? फसवणारा की स्वतःहून फसणारा? असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे. हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं, तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का?” ज्याप्रमाणे आपण डोळे मिटून एखाद्या बाबावर विश्वास ठेवतो, तसाच विश्वास आपण राजकीय नेत्यांवरही ठेवतो का? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. तटकरे साहेब, तुमच्या बोटाच्या जखमेचे रहस्य काय?- लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाचे रहस्य काय? भोंदू अशोक खरातच्या नादी लागू कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? असा तिखट सवाल शरद पवार गटाने या प्रकरणी सुनील तटकरेंना केला आहे. भोंदू अशोक खरात व त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची शरमेने मान खाली गेली आहे. या प्रकरणी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदू खरातच्या सांगण्यानुसार अनामिका कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर असेच आरोप केलेत. सुनील तटकरेंनी आपल्या हाताचा अंगठा अशोक खरातच्या सूचनेनुसार रक्ताचा अभिषेक करण्यासाठी कापला होता का? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. वाचा सविस्तर

नाशिकच्या भोंदूबाबाचा एन्काउंटर होऊ शकतो? महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या नाशिकच्या हायप्रोफाईल भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता एक वेगळेच वळण लागले आहे. “अशोक खरातचे बड्या राजकारण्यांशी आणि मंत्र्यांशी संबंध असल्याने त्यांचे नाव समोर येऊ नये, यासाठी खरातचा एन्काऊंटर करण्याचा कट रचला जाऊ शकतो,” असा खळबळजनक दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर