ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मुंबई हायकोर्टासह नागपूर, वांद्रे कोर्ट ‘बॉम्ब’ने उडवण्याची धमकी:ई-मेलद्वारे आलेल्या धमकीने खळबळ, तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी देण्यात आली. या धमकीमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एका ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली असून, तातडीने न्यायालये रिकामी करून बॉम्बशोधक पथकाद्वारे (BDDS) कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यात केवळ उच्च न्यायालयच नव्हे, तर ‘मुंबईतील सर्व न्यायालये बॉम्बने उडवून देऊ’, असा मजकूर होता. यात प्रामुख्याने वांद्रे आणि किल्ला कोर्टाचाही उल्लेख असल्याचे समजते. ही माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास तातडीने उच्च न्यायालयाची इमारत रिकामी केली. तसेच वांद्रे न्यायालयातही कामकाज स्थगित करून वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अंधेरी न्यायालयात बॉम्ब असल्याची निनावी धमकी मिळाली. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. सध्या न्यायालयाच्या परिसरांना वेढा घालण्यात आला असून, आतून कोणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरून कोणालाही आत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नागपूरच्या कोर्टात दोन आरडीएक्स मुंबईप्रमाणेच नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयालाही सकाळी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी सांगितले की, “सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या न्यायालयाच्या इमारतीत दोन आरडीएक्स (RDX) आधारित स्फोटके पेरली असून लवकरच त्यांचा स्फोट होईल,” असा दावा या मेलमध्ये करण्यात आला होता. यानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवून तपासणी मोहीम हाती घेतली. सुदैवाने अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. सायबर पोलिसांकडून ई-मेलचा तपास सुरू सदरील धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला? त्याचा उद्देश काय? याचा शोध घेण्यासाठी मुंबई आणि नागपूर सायबर पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. धमकीच्या मेलचे आयपी ॲड्रेस ट्रॅक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी आणि वकिलांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मिरा रोडवरील खासगी शाळेलाही धमकीचा मेल दोन आठवड्यांपूर्वी मिरा रोडवरील एका खासगी शाळेलाही अशाच प्रकारची बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्लीतील कार स्फोटाच्या घटनेनंतर देशातील काही ठिकाणी अशा धमक्या मिळाल्या होत्या. 1 डिसेंबर रोजी मिरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलला सकाळी सहा वाजता बॉम्ब धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर शाळेची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली होती, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नव्हती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर