ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सातारामध्ये दोन राजांना मारले:तुमचे मंत्री मार खात असूनही भाजपचे नाव घ्यायला घाबरता, अनिल परबांनी शिंदे गटाला डिवचले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला, जिथे भाजपने संख्याबळ नसतानाही प्रशासकीय बळाचा वापर करून आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. या निवडीसाठी पोलिस अधीक्षकांनी मदत केल्याचा ठपका ठेवत शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आक्रमक पवित्रा घेतला. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधारी मंत्र्यांना चांगलेच डिवचले. भाजप तुम्हाला चिरडत आहे आणि तुमचे मंत्री मार खात असूनही साधे भाजपचे नाव घ्यायलाही घाबरत आहेत, अशा शब्दांत टोलेबाजी करत परब यांनी साताऱ्यातील वादावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. अनिल परब म्हणाले, उपसभापती यांनी सकाळी एसपीला निलंबित केले. काही दिवसांपूर्वी खालच्या सभागृहात तालिका अध्यक्ष यांनी एका अधिकाऱ्याला निलंबित केले. पुन्हा त्याला पदावर घेण्यात आले आहे. आता, उपसभापती यांनी निलंबन केले. आता, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणार आहात का? कल्याणमध्ये तत्कालीन एसपी परमबीरसिंहने त्रास दिला म्हणून यांच्या मंत्र्याने व्यासपीठावर राजीनामा दिला होता. आता कुठे गेले ते वाघ? असा सवाल परब यांनी उपस्थित केला. मार खाण्यापेक्षा मारा सत्तेला लाथ पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, मार खाण्यापेक्षा मारा सत्तेला लाथ आणि पडा ना बाहेर. पण, तुम्हाला भाजपचे नाव सुद्धा घ्यायला घाबरायला होत आहे. सातारामध्ये दोन राजांना मारले, दोन राजे मार खातात, साक्षात शंभुराजे देसाई यांना मारले आहे, असे म्हणत परब यांनी भाजप विरुद्ध शिवसेना या वादात ठिणगी पेटवण्याचे काम केले आहे. तसेच महाराष्ट्रात सगळे प्रश्न संपले आहेत आणि समोर काय येत आहे. मंत्री मार खातोय, भोंदू बाबा मोठ्या लोकांना फसवतोय, लैंगिक अत्याचार करतो आणि तुम्ही काहीच करत नाही. महाराष्ट्राच्या या एपस्टिन फाइलबाबत सरकारचे काय धोरण आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. आम्ही हतबल नाही- शंभूराज देसाई दरम्यान, अनिल परब यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारामध्ये जो प्रकार घडला तो आपल्याला निदर्शनास आणून द्यायचा होता. परब म्हणाले की, आम्ही उठाव केला. पण, त्यावेळी त्यांचे प्रेते येतील, कोथळा बाहेर काढू असे म्हटले जात होते. परंतु काय झाले, आम्ही पुन्हा आलो, सन्मानाने आलो. काय केले यांनी? आम्हाला आता डिवचू नका. आता आम्ही सत्तेत आलो आणि कालसारखे काही कटू अनुभव देखील आले आहेत. याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा अर्थ काढू नये, असे देसाई म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर