ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

संजय राऊतांनी उबाठा संपवण्याची सुपारी घेतली, भाजपचा आरोप:औरंगजेब फॅन क्लब चालवणाऱ्यांनी हिंदुत्वावर बोलू नये- नवनाथ बन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जनाब संजय राऊत यांचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला की शिवसेना संपवण्यासाठी झाला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. उबाठा गटाकडून संपवण्याची सुपारी तुम्ही काँग्रेसकडून घेतली आहे, म्हणून रोज वायफळ बडबड करत उबाठाचे अस्तित्व संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, राऊतांनी सांगू नये की माझा जन्म शिवसेनेत झाला, मी जन्मापासून शिवसेनेत आहे हे ऐकून लोकांना हसू येते.कारण तुम्ही शिवसेनेविरोधात लिहलेले लेख जनतेने वाचले आहेत. उबाठाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे काम तुम्ही करत आहात. येणाऱ्या काळात तुम्ही संपूर्ण उबाठा गट संपवल्याशिवाय राहणार नाही. उबाठामध्ये दोन गट नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना जोरात रंगतो आहे. कारण राज्यसभेच्या निवडणुकीत राऊतांनी ज्या पद्धतीने शरद पवारांचे नाव पुढे करत प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याचे काम राऊतांनी केले. त्यामुळे त्यांच्या दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरे गेले नाही.उबाठा गटामध्ये दुफळी माजली आहे. एका बाजूला राऊतांचा गट तर दुसरीकडे ठाकरेंचा गट असल्याचे दिसून येत आहे. राऊत थोड्या दिवसात उबाठा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी देणार नाही हे त्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील. राऊत सोनिया गांधींच्या चरणी लीन नवनाथ बन म्हणाले की, भाजपमुळे हिंदुत्त्वाचे अध:पतन झाले आहे असा दावा संजय राऊत करत आहेत. ज्यांनी हिंदुत्वांशी फारकत घेत औरंगजेब फॅन क्लब चालवत आहेत त्यांनी भाजपवर टीका करू नये. तुमचे हिंदुत्व काय आहे हे जनतेने पाहिले आहे. तुमच्या हिंदुत्वामुळे तुम्ही काँग्रेसच्या मांडीला-मांडी लावून पुढे बसलात. औरंगजेब फन क्लब आणि अफजल खानाची वंशावळ पुढे जाण्याचे काम तुमच्या बेगडी हिंदुत्वाकडून सुरू आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून सोनिया गांधींच्या चरणी लीन झालात. त्यामुळे जनतेने तुम्हाला नाकारले आहे. तुम्ही हिंदुत्वावर काही बोलू नका तुम्हाला काहीच अधिकार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर