ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन:सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील, तर त्याला अर्थ नाही- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सर्वपक्षीय बैठकीला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर उपस्थित नसतील तर त्या बैठकीला काही अर्थ नाही, पंतप्रधान बैठकीला येणार नव्हते तर आम्ही सर्वांनी त्या बैठकीला जाणे टाळायला हवे होते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री किंवा पोलिस खाते यांना आता शांतपणे काम करू द्या. रोजच या विषयावर चर्चा करत इतर महत्त्वाच्या विषयाकडे पाणी टाकण्याचे काम करू नये. खरात प्रकरणी तपास सुरू असताना त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही. भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन संजय राऊत म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून राजकीय नेतृत्व, अध्यात्म आणि हिंदुत्वाचे अध:पतन झाले आहे. राज्यात जे सध्या सुरू आहे त्यावर कोणावर आणि कितीवेळा बोलणार, मुख्यमंत्री, ज्यांची नावे यामध्ये येत आहेत त्यांनी या विषयावर बोलणं गरजेचे आहे. आमच्या पक्षात काहीही मतभेद नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. मी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा स्थापनेपासूनचा सदस्य आहे. माझ्या जन्मापासून मी या पक्षाचा सदस्य आहे. माझी नियुक्ती बाळासाहेबांनी केली संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केले त्यामधील मी एक आहे. उद्धव ठाकरे आणि माझे काय नाते आहे हे सर्वांना माहिती आहे. उद्धव् ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला मी हजा नव्हतो. पण त्या बैठकीत कोणी नाराजी व्यक्त केली नाही. नाराजीच्या बातम्यावर जर आम्ही काम करायला लागलो तर पक्ष वाढलाच नसता. उद्धव् ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीत कोणी नाराजी व्यक्त केली नाही. ठाकरे गटाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेच्या जागेवरून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षप्रमुखांसमोरच तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘आय वॉन्ट टू प्रोटेस्ट’ (I want to protest) म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर