ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजितदादांसह सुनेत्रा पवारांचाही फोटो गायब!:पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत, विकास लवांडेंची टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. आता अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षाचे सूत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हाती जात आहेत की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करताना म्हटले होते की, तटकरे आणि पटेल यांना पक्षावर कब्जा करायचा आहे. आता इंदापूर येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमातील बॅनरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा तसेच अजित पवार यांचाही फोटो गायब असल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी ट्विट करत टीका केली आहे. ते म्हणाले, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचेच मनसुबे लपून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगडपासून झाली आहे. आदरणीय अजित दादांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतघ्नता म्हणतात, अशी टीका त्यांनी केली आहे. पुढे बोलताना विकास लवांडे म्हणाले, अजित दादांनी यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनेक वर्षे ठेवल्यामुळे त्यांची राज्य पातळीवर प्रतिष्ठा वाढली. यांनी पक्षांतर्गत ओबीसी मराठा असा जातीयवाद सुद्धा वाढवलेला आहे जे अजितदादांना पटत नव्हते. सुनील तटकरे तुमच्यात हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष प्रफुल्ल पटेल यांना सोबत घेऊन काढावा. किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात तर तुमची चार चौकडी घेऊन तुम्ही जावे, तुमच्या कृतघ्नतेचा तीव्र निषेध, असा हल्लाबोल लवांडे यांनी केला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा भव्य सत्कार सोहळा 27 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या बॅनरवर सर्वात मोठा फोटो सुनील तटकरे यांचा लावण्यात आला आहे, त्यानंतर अदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांचा फोटो लावण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा फोटो लावण्यात आला. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आला असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून सुनील तटकरे यांच्यावर टीका केली जात आहे. याच संदर्भातील रोहित पवारांची ही देखील बातमी वाचा NCP वर ताबा मिळवण्यासाठी ‘ब्लॅक मॅजिक’:प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना पक्ष ताब्यात घ्यायचा होता; रोहित पवारांचा गंभीर आरोप! राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पटेल आणि तटकरे यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता, तसेच हा सगळा कट रचला गेला असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर