ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

धार्मिक कार्यक्रमांसाठी मदत केली तर चुकले का?:गॅस सिलिंडर प्रकरणी मंगलप्रभात लोढांचे स्पष्टीकरण, म्हणाले- आमदार म्हणून जबाबदारी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन बांधवांच्या उत्साहवासाठी त्यांच्या मतदारसंघात मलबार हिल येथे 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलिंडरची मागणी केली होती. ही मागणी त्यांनी पत्राद्वारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. यावरून वादंग निर्माण झाले आहे. राज्यात गॅस टंचाई असल्याचा शिक्कामोर्तब एका मंत्र्यानेच केला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तसेच लोढा हे राज्याचे मंत्री असून देखील केवळ एका धर्मासाठी अशी मागणी कशी करू शकतात, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला आहे. यावर आता लोढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंगलप्रभात लोढा त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर व टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले, हिंदू सणाच्यावेळी आणि धार्मिक कार्यक्रमांवेळी टीका करायची ही एक फॅशन झाली आहे. माझ्यावर झालेली टीका त्याच नरेटिव्हचा भाग आहे. माझ्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडारा, जैन धर्माचा कार्यक्रम हे विशेष धार्मिक कार्यक्रम आहे. त्यासाठी गॅसचा साठा नव्हता तर विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते. माझ्याकडे साई भंडाऱ्याचे लोक आले होते, जैन धर्मीय लोक आले होते. मग त्यांना गॅस सिलिंडर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा नाही का? मी त्यासाठी प्रयत्न केला तर काही चुकले का? असा प्रतिसवाल लोढा यांनी उपस्थित केला. आमदार म्हणून माझी जबाबदारी पुढे बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले, 2 तारखेला हनुमान जयंती आहे, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यासाठी विशेष धार्मिक कार्यक्रम असल्याने मला प्रयत्न करावा लागणारच आहे. माझी आमदार म्हणून ती जबाबदारी आहे. त्यामध्ये कोणाला गैर वाटत असेल किंवा कोणाला वाद निर्माण करायचा असेल तर त्याने करावा. मी जबाबदारीपासून पळ काढणार नाही. राज्यात गॅसचा तुटवडा नाही, राज्य सरकार चांगलं काम करत आहे. फक्त विशेष धार्मिक कार्यक्रमांच्यावेळी गॅस सिलिंडर मिळवायला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे तेढ निर्माण करणे सोडा, असेही त्यांनी म्हटले आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांचे गॅसची मागणी करणारे पत्र व्हायरल मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, चैत्र महिन्यात एकदाच येणाऱ्या ओली आयंबील हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा सन आहे. या दिवशी उपवास, पूजा व विशेष धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात. या निमित्ताने मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंबिल (पारंपरिक पेय) तयार करून भक्तांना वितरण केले जाते. माझ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील 16 जैन मंदिरांमध्ये ओली (अंबिल) निमित्त मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली जाते. यासाठी प्रत्येक मंदिरास 5 गॅस सिलिंडरची आवश्यकता आहे. सबब, आपणास नम्र विनंती आहे की, या 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलिंडर उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे. जैन धर्मीय समाज आपल्याकडून या बाबतीत सकारात्मक मदतीची अपेक्षा ठेवून आहे. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी राहू. सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार:गॅस टंचाईवरून रोहिणी खडसेंची बोचरी टीका; मंत्री लोढांकडून सिलिंडरची मागणी इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार वारंवार निवेदन जाहीर करून असा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा करत आहे. मात्र रविवारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच एका पत्राद्वारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गॅस सिलिंडर्सची मागणी केल्यामुळे या तुटवड्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. लोढा यांनी गॅस सिलिंडरच्या मागणीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत टीका केली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर