ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

दिलासादायक; कोकणात मान्सूनसाठी पोषक वातावरण:25 जूनला मुंबईत धडकणार; विदर्भ, मराठवाडा अन् पुण्यात कधी?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चालू वर्षी जून महिना अर्धा अधिक संपला तरी पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. मात्र, आता मान्सूनबाबत एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. येत्या २३ जूनपासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार होणार असून, मुंबईत मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळाले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर, प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ आणि २३ जूनच्या सुमारास दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या सागरी क्षेत्रांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल. सुरुवातीला पावसाचा जोर हळूहळू वाढेल आणि २४ ते २६ जून दरम्यान हा पाऊस उत्तर कोकणसह महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये प्रवेश करेल. विविध हवामान मॉडेल्सनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यातील बहुतांश भागांत पावसाची चांगली हजेरी पाहायला मिळू शकते. ‘एल-निनो’चे सावट; मुंबईत यंदाही मान्सून उशिरानेच मुंबईत मान्सून पोहोचण्याची सरासरी तारीख ११ जून असली, तरी या वर्षी ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे मान्सून रेंगाळला आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२३ या एल-निनोच्या वर्षांतही मुंबईत तब्बल १४ दिवस उशिराने, म्हणजेच २५ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. चालू वर्ष २०२६ मध्येही एल-निनोचा प्रभाव असल्याने, यंदाही नेमकी तीच तारीख म्हणजे २५ जून रोजीच मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. कोकण आणि मुंबईत मुसळधार पावसाचे संकेत २५ जून ते १ जुलै या कालावधीत मुंबई आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात मान्सूनचा जोरदार प्रहार पाहायला मिळू शकतो. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या दिवसाच्या दमट हवेपासून आणि रात्रीच्या असह्य उकाड्यापासून आज (२० जून) शनिवारपासूनच हळूहळू दिलासा मिळण्यास सुरुवात होईल, कारण वातावरणात बदल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. वेंगुर्ला, देवगड आणि हर्णाई या भागात सध्या पूर्वमोसमी सरी कोसळत असून, लवकरच तिथे मुख्य मान्सूनच्या पावसाला गती मिळणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार? मुंबईत पाऊस दाखल झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मान्सून बरसेल. पूर्व मराठवाडा व विदर्भ या भागातील शेतकऱ्यांना मान्सूनसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पूर्व मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा मुख्य पाऊस सक्रिय होईल. तत्पूर्वी, या भागात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावू शकतो. मुख्य मान्सून धडकण्यापूर्वी उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळतील. या हवामानाच्या अंदाजामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर