ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी व्यावसायिकाला लुटले!:तब्बल 55 लाखांचा घातला गंडा; दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक होण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, मात्र कल्याणमध्ये याच्या अगदी उलट असा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे चक्क दोन महिलांनी संगनमत करून एका नामांकित व्यावसायिकाला लग्नाच्या जाळ्यात ओढले आणि त्याची तब्बल 55 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत महात्मा फुले चौक पोलिसांनी धडक कारवाई करत या दोन्ही आरोपी महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील एका नामांकित व्यावसायिकाची जयश्री पाटील या महिलेने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी ओळख करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत कामाला असल्याचे भासवून तिने सुरुवातीला या व्यावसायिकासोबत जवळीक वाढवली. त्यानंतर इन्शुरन्स पॉलिसीच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून तिने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात आलीच नाही. या आर्थिक फसवणुकीनंतर काही दिवसांनी, रोमा हिने जयश्री पाटीलच्या माध्यमातून या व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. लग्नाला होकार मिळाल्याचा फायदा घेत, या दोन्ही महिलांनी संगनमत करून वेळोवेळी विविध खोटी कारणे सांगत व्यावसायिकाकडून आणखी पैसे उकळण्यास सुरुवात केली. तक्रारदार व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, इन्शुरन्स आणि लग्नाचे आमिष दाखवून या दोन्ही महिलांनी आतापर्यंत त्यांची तब्बल 55 लाख रुपयांची मोठी फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यावसायिकाने तत्काळ महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला मुख्य आरोपी रोमा परदेशी हिला अटक केली होती, मात्र तिची नंतर जामिनावर सुटका झाली. या गुन्ह्याचा सखोल तपास करत असतानाच पोलिसांनी नुकतीच तिची साथीदार जयश्री पाटील हिलाही कोल्हापूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून माझी मोठी फसवणूक करण्यात आली असून, आरोपींकडून माझे सर्व पैसे वसूल करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता या तक्रारदार व्यावसायिकाने पोलिसांकडे केली असून महात्मा फुले पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर