ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जालियनवाला बाग ते वाघा बॉर्डर… विद्यार्थ्यांची इतिहास, संस्कृती आणि देशभक्तीची अविस्मरणीय सफर!

15 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक सहलीत इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा अनोखा संगम अनुभवत देशभक्तीची प्रेरणा घेतली. दि. २२ मार्च २०२६ ते ३० मार्च २०२६ दरम्यान आयोजित या सहलीत ५२ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

या सहलीचे प्रमुख आकर्षण ठरले अमृतसर येथील जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक. १३ एप्रिल १९१९ रोजी इंग्रजांनी निःशस्त्र भारतीयांवर केलेल्या क्रूर गोळीबाराच्या खुणा पाहताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तर हृदयात देशप्रेमाची ज्वाला पेटली. शेकडो शहीदांच्या बलिदानाने भारलेले हे स्थळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

यानंतर सुवर्ण मंदिरातील शांतता आणि अध्यात्मिक वातावरण अनुभवत विद्यार्थ्यांनी भारत-पाक सीमेवरील वाघा बॉर्डरवरील ‘Beating Retreat Ceremony’चा थरार अनुभवला. देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेले वातावरण विद्यार्थ्यांना रोमांचित करून गेले.

सहलीदरम्यान डलहौजी येथील वन्यजीव अभयारण्य, ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध असलेले खज्जीयार, तसेच धर्मशाला येथील हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे मैदान आणि दलाई लामा मठ यांना भेट देत विद्यार्थ्यांनी तिबेटियन संस्कृती, स्थानिक लोकजीवन, लोककला आणि आर्थिक क्रियांची माहिती घेतली. निसर्ग, शेती व वन्यजीव परिसंस्थेचा अभ्यासही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजित करण्यात आली. डॉ. गजानन सोडनर, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब देशमुख, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. माधुरी तानुरकर, डॉ. विभा घोडखांदे आणि डॉ. शैलेश आत्राम यांनी सहलीचे नियोजन व अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पाडली.

सहलीसाठी परवानगी दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्राचार्य डॉ. घरडे यांचे आभार मानले. तसेच सहल यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभले.

एकूणच, या सहलीने विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव, संस्कृतीचे भान आणि देशप्रेमाची प्रेरणा देत एक अविस्मरणीय अनुभव दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर